किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– ‘जय श्री राम’ आणि भगव्या रंगाने उजळले ‘अँटिलिया’,
मुंबई, (२१ जानेवारी) – केवळ अयोध्याच नाही तर, संपूर्ण जग राममयीने सजले आहे. रामलल्लाच्या अभिषेकसाठी आता काही क्षणच उरले आहेत. संपूर्ण जग रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर ’अँटिलिया’ देखील भगव्या आणि ’जय श्री राम’च्या दिव्यांनी सजवण्यात आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मुकेश अंबानी यांनाही प्राण प्रतिष्ठासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया पूर्णपणे भगव्या रंगाच्या दिव्यांनी उजळून निघाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अँटिलियाच्या भिंतींवर ’जय श्री राम’ लिहिलेले दिसते. एवढेच नाही तर मधोमध दिवेही लावण्यात आले आहेत. अँटिलियाच्या वरच्या मजल्यावर राम मंदिराची प्रतिकृतीही प्रदर्शित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घरोघरी दिवे लावण्याचे आवाहन केले होते. घरे उजळून टाका. प्रभू श्रीरामाचे आगमन दिवाळीसारखे साजरे करा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
सोमवारी राम मंदिरात होणार्या अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्या शहर नववधूप्रमाणे सज्ज झाले असून, या बहुप्रतिक्षित सोहळ्याच्या धार्मिक विधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. या सोहळ्याच्या दुसर्याच दिवशी हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. ’प्राणप्रतिष्ठा’ सोहळा दुपारी १२.२० वाजता सुरू होणार असून, तो दुपारी १ वाजेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. यानंतर पंतप्रधान कार्यक्रमस्थळी संत आणि प्रतिष्ठित व्यक्तींसह ७,००० हून अधिक लोकांच्या मेळाव्याला संबोधित करतील.