किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– व्यापारी संघटना ‘कॅटची माहिती,
नवी दिल्ली, (२१ जानेवारी) – अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा केवळ एक दिवसावर आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी अनेक स्तरांतून सुरू असून, उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या वातावरणाचा व्यापारी जगतालाही मोठा फायदा होत आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी आतापर्यंत देशभरातील व्यापार्यांनी एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती व्यापारी संघटना कॅटने दिली आहे.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ही किरकोळ व्यापार्यांची संघटना आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे व्यापारासाठी पूरक असे वातावरण निर्माण झाले असून, देशभरातील व्यापार्यांनी एक लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय केला आहे. व्यापारी समुदायाने ‘हर शहर अयोध्या-घर घर अयोध्या’ ही राष्ट्रीय मोहीम राबवली आहे. या मोहिमेंतर्गत दिल्ली आणि देशातील सर्व राज्यांतील व्यापारी संघटनांनी २२ जानेवारी रोजी आपापल्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. हे सर्व कार्यक्रम बाजारपेठेतच होतील. त्यामुळेच उद्या दिल्लीसह देशातील सर्व बाजारपेठा सुरू राहतील आणि व्यापारी सर्वसामान्यांसोबत श्री राम मंदिराचा उत्सव साजरा करतील.
सोमवारी दिल्लीत दोन हजारांहून अधिक छोटे-मोठे कार्यक्रम होणार आहेत. देशभरात ३० हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शतकातील हा सर्वांत मोठा दिवस असेल, जेव्हा एकाच दिवशी अनेक कार्यक्रम होतील असे कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले. घर, बाजार, मंदिरे आणि इतर ठिकाणे सजवण्यासाठी फुलांची मागणी खूप वाढली आहे. मातीचे दिवे विकत घेणारा लोकांचाही ओघ कायम आहे. मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. लोक प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात मिठाई खरेदी करीत आहेत. बाजारात राम झेंडे आणि राम फलकांचा तुटवडा आहे.