किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०८ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अभद्र टिप्पणीनंतर मालदीव अचानक प्रकाशझोतात आला. हा देश केवळ टुरिझम नव्हे तर, टेररिझमचाही हॉटस्पॉट ठरत आहे. इसिस या दहशतवादी संघटनेत मालदीवमधूनच सर्वाधिक भरती झाली आहे.
मालदीव हा सुन्नीबहूल देश आहे. हा देश अतिशय कट्टरवादी असून, दहशतवाद्यांच्या विरोधात त्याची मवाळ भूमिका राहते, असे अमेरिकेनेही म्हटले आहे. कधीकाळी बौद्ध धर्मीय असलेला मालदीव वेगाने मुस्लिम देश झाला. गैर-मुस्लिमांना येथे नागरिकत्वही दिले जात नाही.
मालदीव इतका कट्टर आहे की, या देशात गैर-मुस्लिमांना धर्माचरणाची परवानगी दिली जात नाही. ते सार्वजनिकरीत्या पूजापाठ करू शकत नाहीत. अमेरिकन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या २०२२ मधील अहवालात याचा उल्लेख करण्यात आला आहे. देवांच्या मूर्ती स्थापित केल्याच्या आरोपाखाली या देशात तीन भारतीय पर्यटकांना अटक करण्यात आली होती. मालदीवमध्ये जवळपास २९ हजार भारतीय राहतात. मात्र, त्यांनी इस्लाम स्वीकारला कींवा त्यांना आपला धर्म लपवावा लागतो.
मालदीवचे शासक भारताच्या चोल साम्राज्याचे होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. मात्र, हा देश मुस्लिम कसा झाला आणि भारतीय शासक मालदीवपर्यंत कसे पोहोचले, याबाबत वेगवेगळी मतधारणा आहे. चोल साम्राज्यापूर्वी नवव्या शतकात मालदीवमध्ये कलिंग राजा ब्रह्मदित्यची सत्ता होती. अकराव्या शतकात मालदीववर महाबर्णा अदितेयचे शासन होते. तिथे आढळणार्या शिलालेखांवर याचे पुरावे आढळतात.
शेवटच्या बौद्ध राजाने स्वीकारला इस्लाम
पूर्वी मालदीवमध्ये बौद्ध धर्म होता. इसवी सन पूर्व तिसर्या शतकात येथील बहुतांश नागरिक बौद्ध होते. मालदीवच्या ५० पेक्षा जास्त द्वीपांवर बौद्ध स्तुप आढळले आहेत. मात्र, बहुतांश नष्ट करण्यात आले. शेवटचा बौद्ध राजा धोवेमीने ११५३ मध्ये इस्लाम स्वीकारला आणि मुहम्मद इब्न अब्दुल्ला असे त्यांचे नाव पडले.