किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०८ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब यांना समन्स बजावला आणि त्यांना खडे बोल सुनावत, मालदीवचा तीव्र निषेध केला.
मालदीवचे राजदूत इब्राहिम साहिब परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात आले. स्पष्टीकरण दिल्यानंतर काही वेळातच ते निघून गेले. दरम्यान, मोदी आणि भारताविरुद्ध अपमानास्पद टिप्पणीप्रकरणी मालदीवने तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीप दौरा केला. तेथील काही फोटो मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केले. सोबतच त्यांनी भारतीयांना लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. यानंतर मालदीवच्या उपमंत्री मरियम शिऊना यांनी मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या ट्विटवर वाद झाल्यानंतर त्यांनी ते डिलीटही केले. रविवारपासून समाज माध्यमावर भारतीय वापरकर्त्यांकडून मालदीववर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली. सोशल मीडियावर अनेक भारतीयांनी दावा केला की, त्यांनी मालदीवची सहल रद्द केली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लक्षद्वीपला पर्यायी पर्यटनस्थळ म्हणून निवड केल्याचे सांगितले.