किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०७ जानेवारी) – मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या अपमानास्पद टिप्पणीच्या मुद्यावर भारताने आक्रमक भूमिका घेतली. मालेतील भारतीय उच्चायुक्तांनी या टीकेवर जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर मालदीवने हात झटकत त्यांचे हे वैयक्तिक मत आहे आणि मालदीव सरकार त्यांच्या विचारांचे प्रतिनिधित्व करीत नाही, असे म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौर्याची छायाचित्रे एक्सवर शेअर केली होती आणि भारतीयांनी लक्षद्वीप येथे पर्यटनासाठी जावे, असे आवाहन केले होते. मालदीवच्या युवा सशक्तीकरण मंत्री मरियम शिउना यांनी मोदी यांच्या पोस्टवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. भारतीय वापरकर्त्यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर शिउना यांनी ही पोस्ट डिलीट केली. मालदीव सरकारने या प्रकरणी निवेदन जारी केले आहे. मालदीव सरकारला विदेशी आणि उच्चपदस्थ व्यक्तींच्या विरोधात समाज माध्यमांवर झालेल्या अपमानकारक टिप्पण्यांची माहिती आहे. महिला मंत्र्यांचे हे वैयक्तिक मत आहे आणि मालदीव सरकार या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाही, असे मालदीवने या निवेदनात म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर लोकशाही तसेच अत्यंत जबाबदारीने केला पाहिजे. ज्यामुळे द्वेष आणि नकारात्मकता पसरू नये तसेच मालदीव आणि भारतातील जवळचे संबंध बिघडू नये, अशा पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर झाला पाहिजे. या व्यतिरिक्त अधिकारी अशा अपमानास्पद भाष्य करणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यास मालदीव पुढे-मागे पाहणार नसल्याचे मालदीवने स्पष्ट केले.
मोदींच्या लक्षद्वीप दौर्यानंतर वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच लक्षद्वीपच्या केलेल्या दौर्यानंतर मालदीवच्या महिला मंत्र्यासह कित्येक राजकारण्यांनी यावर अपमानास्पद टिप्पण्या केल्याने हा वाद उफाळला. शिउना यांच्या व्यतिरिक्त जाहीद रमीझसह मालदीवच्या इतर नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौर्याची थट्टा केली होती.
मालदीव नॅशनल पार्टीकडून घरचा अहेर
मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवर मालदीव नॅशनल पार्टीने सरकारवर टीका केली आहे. एका सरकारी अधिकार्याने विदेशी राष्ट्रप्रमुखांच्या विरोधात केलेल्या वर्णद्वेषी आणि अपमानकारक टिप्पणीचा आम्ही निषेध करतो. हा प्रकार अस्वीकारार्ह आहे. यामध्ये सहभागी असलेल्या लोकांवर आवश्यक कारवाई करावी, अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचे मालदीव नॅशनल पार्टीने म्हटले आहे.