किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– सय्यद तनवीर नसरिन यांचे मत,
कोलकाता, (१० जानेवारी) – मालदीवमधील मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर त्याचे सर्वत्र जागतिक पडसाद उमटत आहेत. टिप्पणी करणार्या मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर मालदीवमधील भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या माजी संचालक सय्यद तनवीर नसरिन यांनी अधोरेखित केले आहे की, सध्याची परिस्थिती अचानक उद्भवलेली नाही, तर ती बर्याच काळापासून सुरू आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या भारतविरोधी भावनांची ही अभिव्यक्ती आहे आणि त्याला परकीय शक्तींनी प्रोत्साहन दिले आहे.
२०१९ ते २०२३ या कालावधीत मालदीव प्रजासत्ताकातील माले येथील भारतीय उच्चायुक्तालयात भारतीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालक म्हणून काम केलेल्या नसरिन यांनी भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’चा प्रतिकार करण्यासाठी चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या प्रभावावर आपले मत मांडले. ‘सॉफ्ट पॉवर’ हा शब्द आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये वापरला जातो, ज्या अंतर्गत एखादा देश अप्रत्यक्षपणे सांस्कृतिक किंवा वैचारिक माध्यमांद्वारे दुसर्या देशाच्या वर्तनावर किंवा हितसंबंधांवर प्रभाव पाडतो. वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सध्याच्या राजनैतिक वादाला ‘दुर्भाग्यपूर्ण’ म्हणून संबोधले आणि ‘मालदीववर बहिष्कार टाकणे’ सार‘या प्रतिगामी भावनांविरुद्ध इशारा दिला.
जे काही घडत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि मी मालदीवच्या तीन मंत्र्यांच्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्धच्या, टिप्पणीचा निषेध करते, नसरिन म्हणाल्या की, ही अचानक घडलेली किंवा वेगळी घटना नाही. काही काळापासून परकीय शक्तींच्या इशार्यावर भारतविरोधी भावना भडकावल्या जात आहेत. पंतप्रधान मोदींच्या विरोधात अपमानास्पद सोशल मीडिया पोस्टला प्रत्युत्तर म्हणून, मालदीवच्या भारतातील राजदूताला परराष्ट्र मंत्रालयाने बोलावले होते. तथापि, मालदीव सरकारने स्पष्ट केले की, या टिप्पण्या त्यांच्या अधिकृत मतांचे प्रतिनिधित्व करीत नाहीत.