किमान तापमान : 23.23° से.
कमाल तापमान : 23.72° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.23° से.
22.99°से. - 24.74°से.
रविवार, 12 जानेवारी घनघोर बादल22.18°से. - 25.29°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.33°से. - 26.94°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.75°से. - 25.03°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.26°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश24.45°से. - 26.41°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल-पाकिस्तान-चीनच्या धोक्याचा सामना करण्याचे सामर्थ्य,
हैदराबाद, (१० जानेवारी) – अदानी डिफेन्स अॅण्ड एयरोस्पेसद्वारे निर्मिती करण्यात आलेल्या दृष्टी १० स्टार लायनर हे ड्रोन नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांच्या हस्ते बुधवारी लाँच करण्यात आले. सर्व प्रकारांच्या वातावरणात उड्डाण करण्यास सक्षम असलेला हा एकमेव लष्करी मंच आहे, असे उत्पादक कंपनीने म्हटले. नौदलाच्या मोहिमांमध्ये सहभागी होण्यासाठी हे ड्रोन हैदराबाद येथून पोरबंदरपर्यंत उड्डाण करणार आहे.
भारतीय नौदलाच्या गरजांप्रमाणे तयार केलेल्या आराखड्याचा उल्लेख करताना आ. हरिकुमार यांनी, संरक्षण आणि सुरक्षेमध्ये आत्मनिर्भरता सक्षम करण्याच्या अदानी कंपनीची स्तुती केली. आयएसआर तंत्रज्ञान आणि समुद्रातील प्रभुत्वासाठी आत्मनिर्भरतेच्या शोधातील हे एक परिवर्तनकारी पाऊल आहे. स्थानिक क्षमता विकसित करण्यासाठी मागील काही वर्षांत पद्धतशीरपणे काम करून देशातील कंपनीने मानवरहित प्रणालींबाबत आपली बांधिलकी दाखवली आहे. दृष्टी-१० मुळे नौदलाच्या क्षमता वाढतील. सतत विकसित होत असलेल्या सागरी निगराणी आणि माग घेण्याची आमची तयारी या माध्यमातून बळकट होणार आहे. ६० टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह भारतात उत्पादित मध्यम उंचीचे बळकट मानवरहित विमान असणे हे आमच्यासाठी एक स्वप्न आहे. या माध्यमातून आपल्या क्षमतेचे प्रदर्शन घडवण्यात आले आहे, असे हरिकुमार यांनी सांगितले.
दृष्टी-१० स्टार लायनरची वैशिष्ट्ये
– ४५० किलो वजन वाहून नेण्याची क्षमता
– अदानी डिफेन्सने केले विकसित
– मानवरहित ड्रोन
– सर्वच प्रकारांच्या हवामानात काम करण्यास सक्षम