किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०४ नोव्हेंबर) – सौदी अरेबियाची नजर आता फुटबॉल आणि गोल्फनंतर जगातील दुसर्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खेळावर आहे. सौदी क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सल्लागारांनीही त्यांच्या योजनेबाबत भारत सरकारच्या अधिकार्यांशी चर्चा केली आहे. फुटबॉलनंतर सौदी अरेबियाची नजर आता इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलवर आहे. सौदी अरेबियाला आयपीएलमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करायची आहे. सौदी अरेबियाने याआधीच फुटबॉल आणि गोल्फमध्ये मोठी गुंतवणूक केली असून आता ते क्रिकेटवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. त्यासाठी त्यांनी खास योजनाही बनवली आहे.
सौदी अरेबिया जगातील दुसर्या क्रमांकाच्या खेळात गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. यासह तो आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आयपीएलचे होल्डिंग कंपनीत रूपांतर करण्याचा सौदीचा प्रस्ताव आहे. एका रिपोर्टनुसार, क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सल्लागारांनी त्यांच्या योजनेबाबत भारत सरकारच्या अधिकार्यांशीही चर्चा केली आहे. अहवालानुसार, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सल्लागारांनी ३० अब्ज डॉलर्सच्या आयपीएलला होल्डिंग कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी भारतीय सरकारी अधिकार्यांशी चर्चा केली आहे. सप्टेंबरमध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी२० शिखर परिषदेसाठी सौदीचे क्राउन प्रिन्स भारतात आले तेव्हा हे संभाषण झाले. अहवालात म्हटले आहे की सौदी अरेबियाने लीगमध्ये ५ अब्ज पर्यंत गुंतवणूक करण्याचा आणि इतर देशांमध्ये विस्तार करण्यास मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सौदी अरेबियाला या योजनेवर लवकरच काम करायचे आहे. मात्र, भारत सरकार आणि बीसीसीआय यावर संपूर्ण विचारविनिमय केल्यानंतरच निर्णय घेतील. पुढील वर्षी होणार्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल.