किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०५ नोव्हेंबर) – वाढलेल्या आर्थिक हालचाली आणि हवामानातील सुधारणांमुळे चालू आर्थिक वर्षातील एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत भारताचा वीज वापर एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे ९.४ टक्क्यांनी वाढून सुमारे ९८४.३९ अब्ज युनिट्सवर पोहोचला आहे.
ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात एप्रिल-ऑक्टोबर या कालावधीत वीज वापर ८९९.९५ अब्ज युनिट्स होता. २०२२ मध्ये याच कालावधीत विजेची मागणी जवळपास २४१ गीगावॅटहून अधिक होती. हीच मागणी २०२२ मध्ये २१५.८८ गीगावॅट होती. ऑक्टोबरमध्ये देशाचा वीज वापर सुमारे २२ टक्क्यांनी वाढून १३८.९४ अब्ज युनिट झाला. सण-उत्सव आणि वाढत्या आर्थिक हालचालींमुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एका वर्षापूर्वी याच महिन्यात, वीज वापर ११३.९४ अब्ज युनिट होता, जो ऑक्टोबर २०२१ मध्ये नोंदवलेल्या ११२.७९ अब्ज युनिटपेक्षा जास्त होता.
गेल्या काही महिन्यांत विजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असे टाटा पॉवर दिल्ली डिस्ट्रिब्यूशन लि. च्या प्रवक्त्याने सांगितले. ऑक्टोबर २०२३ मध्ये, टाटा पॉवर-दिल्ली डिस्ट्रिब्युशन लिमिटेडच्या कार्यक्षेत्रातील वीज वापर जवळपास १०.१६ टक्क्यांनी वाढून ८४५ एमयू (मिलियन युनिट) झाला, ऑक्टोबर २०२२ मध्ये हा वीज वापर ७६७ एमयू होता. या वर्षी हिवाळा सुरू होण्यास उशीर झाल्यामुळे मागणी जास्त राहिली आहे. ऑक्टोबर महिन्यातील सणासुदीच्या उपक्रमांमुळेही मागणी वाढली आहे, असे प्रवक्त्याने स्पष्ट केले. तथापि, यावर्षी सौम्य उन्हाळ्यामुळे, एप्रिल-मे या कालावधीत विजेचा वापर मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले. ऊर्जा मंत्रालयाने उन्हाळ्यात देशातील विजेची मागणी २२९ ॠगीगावॅट वर जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता. एप्रिल-जुलैमध्ये अवकाळी पावसामुळे मागणी अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचली नाही. यावर्षी मार्च, एप्रिल, मे आणि जूनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे विजेच्या वापरावर परिणाम झाल्याचे उद्योग तज्ज्ञांनी सांगितले.