किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– देशातील ८० कोटी लोकांना होणार लाभ,
दुर्ग, (०४ नोव्हेंबर) – कोरोना काळात देशातील ८० कोटी गरीब जनतेला दर महिन्याला मोफत धान्य वाटपाची केंद्र सरकारची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या पाच वर्षांसाठी वाढवली आहे. छत्तीसगडच्या दुर्गमध्ये प्रचार सभेला शनिवारी संबोधित करताना मोदींनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, नागरिकांच्या आशीर्वादाने देशातील ८० कोटी गरीब जनतेला संकटकाळात केंद्र सरकारने मोफत धान्य वाटले. ही योजना नंतरच्या काळातही सुरू ठेवली. आता पुढच्या ५ वर्षांसाठी केंद्र सरकार ही योजना तशीच सुरू ठेवणार आहे. यासाठी आपले आशीर्वाद आम्हाला लाभले, हे आमचे भाग्य आहे.
कोरोना काळातील टाळेबंदी आणि आर्थिक संकट या पृष्ठभूमीवर मोदी सरकारने देशातील ८० कोटी जनतेसाठी मोफत धान्य योजना सुरू केली होती. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला मोफत ३५ किलो धान्य वाटप करण्यात येते. यात तांदूळ, गहू तसेच डाळी अन्य विशिष्ट पदार्थांचा समावेश आहे. जानेवारी २०२३ मध्ये या योजनेला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली होती. यासाठी केंद्र सरकारने दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आर्थिक बोजा सहन केला आहे. आता ही मोफत धान्य योजना पुढच्या ५ वर्षांसाठी तशीच सुरू ठेवण्याचे जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा मास्टर स्ट्रोक मारला असल्याचे मानले जात आहे.