किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– युरेशियन प्लेट्समध्ये मोठी हालचाल,
काठमांडू/नवी दिल्ली, (०४ नोव्हेंबर) – . भूगर्भातील या हालचालींमुळे पश्चिम नेपाळच्या गोरखा जिल्ह्यापासून भारतातील डेहराडूनपर्यंत तीव्र क्षमतेचा भूकंप येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. भारताचा शेजारी नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री आलेल्या ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाने प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत, १५४ लोक मृत्यूमुखी पडले असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाच्या तीव्र झटक्यांमुळे नेपाळमधील अनेक घरं जमीनदोस्त झाली आहेत. नेपाळमध्ये सातत्याने लहानमोठे भूकंप येत असून सर्वाधिक नुकसान रुकुम पश्चिम आणि जाजरकोट या जिल्ह्यांमध्ये झाले आहे. भूकंपविषयक अभ्यासकांच्या मते, नेपाळ हा सर्वाधिक भूकंपप्रवण देश असून नेपाळच्या पश्चिम पर्वतीय क्षेत्रात मोठा भूकंप येण्याचा धोका सातत्याने वाढतो आहे.
नेपाळच्या भूकंप निगराणी आणि संशोधन केंद्रात कार्यरत वरिष्ठ संशोधक भरत कोईराला यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ काळापासून जमिनीच्या खाली सक्रीय युरेशियन प्लेट्सचे घर्षण सुरू आहे. नेपाळ या दोन प्लेट्सच्या सीमेवर असून, सर्वाधिक सक्रीय भूकंपीय क्षेत्र म्हणजेच सेसमिक झोनमध्ये आहे. पृथ्वीच्या पोटात जमा झालेली ही एनर्जी अर्थात ऊर्जा बाहेर फेकण्यासाठी भूकंप येतात आणि एकूण ऊर्जेचे प्रमाण बघता, गेल्या ५२० वर्षांमध्ये पश्चिम नेपाळमध्ये एकही मोठा भूकंप आलेला नाही. मात्र, टेक्टॉनिक हालचाली सातत्याने सुरू आहेत.
प्रत्येक १०० वर्षांत प्लेट्स समोर सरकत असून, हिमालय या जगातील सर्वात युवा पर्वतरांगा आहेत. त्याच्या दक्षिणेकडे तिबेट आणि भारतीय महाद्विपीय प्लेटमध्ये घर्षण होत असून युरेशियाई प्लेट वर उचलली जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ही प्लेट दरवर्षी २ मीटरने समोर सरकत आहे. यावर्षी १ जानेवारीपासून आतापर्यंत नेपाळमध्ये ४ आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेचे एकूण ७० भूकंप आले आहेत