किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– बदनामीच्या प्रकरणात तेजस्वी यादव सर्वोच्च न्यायालयात,
अहमदाबाद, (०४ नोव्हेंबर) – बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शनिवारी अहमदाबाद ट्रायल कोर्टाला माहिती दिली की त्यांनी मानहानीचा खटला हस्तांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात ६ नोव्हेंबरला सुनावणी होऊ शकते. आरजेडी नेत्याने आपल्या वकिलामार्फत ट्रायल कोर्टाकडून या खटल्यात हजर राहण्यापासून सूट मागितली. २२ सप्टेंबर रोजी अहमदाबाद ट्रायल कोर्टाने मानहानीच्या प्रकरणात तेजस्वी यादव यांना समन्स बजावले होते. तेजस्वी यादव यांनी आपल्या एका वक्तव्यात ’केवळ गुजरातीच ठग असू शकतात’ असे म्हटले होते. याच्या निषेधार्थ गुजरातचे सामाजिक कार्यकर्ते हरेश मेहता यांनी तेजस्वी यादव यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. आता या प्रकरणी तेजस्वी यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ट्रायल कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी २ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, हरेश मेहता यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सर्वोच्च न्यायालयाने अद्याप या प्रकरणी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत, त्यामुळे तेजस्वी यादव यांच्या अनुपस्थितीतही ट्रायल कोर्ट सुनावणी सुरू ठेवू शकते.
हजेरीतून सूट मागताना तेजस्वी यादव म्हणाले की, ते कायद्याचे पालन करणारे नागरिक आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. युक्तिवाद ऐकल्यानंतर ट्रायल कोर्टाने सुनावणी २ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. तेजस्वी यादव यांनी नुकतेच आपल्या एका वक्तव्यात म्हटले होते की, सध्याच्या परिस्थितीत फक्त गुजरातीच ठग असू शकतात आणि त्यांचा गुन्हाही माफ केला जाईल. तो देशातून फरार झाला तरी त्याला जबाबदार कोण? या वक्तव्याविरोधात हरेश मेहता यांनी मानहानीची तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये संपूर्ण गुजरातींना ठग संबोधून त्यांचा अपमान करण्यात आल्याचे म्हटले होते. या प्रकरणी हरेश मेहता यांनी तेजस्वी यादवला शिक्षेची मागणी केली आहे.