किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोबतीने भारत-ऑस्ट्रेलिया २+२ मंत्रिस्तरीय संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स १९ ते २० नोव्हेंबर २०२३ दरम्यान भारतात येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात २० नोव्हेंबर रोजी संरक्षण सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठक होणार आहे, त्यानंतर २+२ संवाद होईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासोबत त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष, उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग हे २+२ संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवतील. २+२ मंत्रीस्तरीय संवादाचे उद्घाटन सप्टेंबर २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झाले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया एक सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करत आहेत आणि मंत्री मार्ल्स यांच्या भेटीमुळे परस्पर सहकार्य तसेच द्विपक्षीय संरक्षण सहकार्याला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. २+२ संवाद आणि संरक्षण मंत्र्यांच्या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या व्यापक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान मार्ल्स आपल्या भारत भेटीदरम्यान १९ नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरारही अनुभवतील.