किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.34°से. - 30.47°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (१९ नोव्हेंबर) – अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उद्या रविवारी होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ज्वर साऱ्या देशभरात पसरला आहे. या सामन्याला महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींना हजेरी लावता यावी म्हणून मुंबई-अहमदाबाद मार्गावर तीन विश्वचषक विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जाणार असून, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व रेल्वे गाड्या आरक्षण सुरू होताच अवघ्या दहा मिनिटांत फुल्ल झाल्या. एवढेच नव्हे तर, प्रतीक्षा यादी शंभरच्या वर गेली आहे.
मध्य रेल्वेने शुक्रवारी मुंबई ते अहमदाबाद मार्गावर दोन विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे जाहीर केले. ही घोषणा केल्यानंतर आणि आरक्षण सुरू होताच सात ते दहा मिनिटांत तिकिटा फुल्ल झाल्या. एवढेच नव्हे तर, या ट्रेनमध्ये प्रतीक्षा यादी ४०० च्या वर गेली आहे. तरीही तिकीट खरेदी करण्यासाठी क्रिकेटप्रेमींचे प्रयत्न सुरूच आहे. क्रिकेटप्रेमींचा हा उत्साह पाहाता सेंट्रल रेल्वेने आणखी एक म्हणजे तिसरी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.