|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.01° C

कमाल तापमान : 34.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 28 %

वायू वेग : 5.69 Mps

स्थळ : Mumbai, IN

34.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.08°C - 34.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.38°C - 31.29°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.82°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.9°C - 32.28°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.21°C - 30.5°C

sky is clear
Home » साहित्य » जादू इंग्लिश लेखणीची : एक परीक्षण

जादू इंग्लिश लेखणीची : एक परीक्षण

  • पुस्तक-परीक्षण : प्रा. डॉ. विजया तेलंग,
  • मराठी विभाग प्रमुख, गुलबर्गा विश्वविद्यालय, गुलबर्गा.

satalkar-jadu englishchya lekhanichiगुलबर्गा येथील मराठी लेखक श्री सर्वोत्तम सताळकर यांनी लिहिलेला ‘जादू इंग्लिश लेखणीची’ हा एकूण अकरा लेखांचा संग्रह आहे. या लेखसंग्रहात ऑर्थर कॉनन डॉयल, अगॉथा ख्रिस्ती, आर. के. नारायण आयर्विंग वॉलेस मारीओ पुझो जे.के. रोलींग डॅन ब्राऊन आणि चेतन भगत आदी पाश्चात्य आणि भारतीय  लेखकांच्या कृतीची ओळख करून दिली आहे. लेखकांच्या प्रमुख कादंबऱ्या, त्यातील कथाभाग आणि पात्रे आणि त्यांचे यशापयश हे देखील लेखकाने खुमासदार पद्धतीने रंगवले आहे. हे सगळे लेखक कादंबरीकार आहेत यावरून कादंबरी या वाड्मयप्रकाराबद्दलची लेखकाची आस्था स्पष्ट होते.
पहिला लेख हा शेरलॉक होम्स या अजरामर व्यक्तिरेखेबद्दल आणि ती निर्माण करणाऱ्या कॉनन डॉयल या लेखकाबद्दल आहे. डॉयलनी होम्सच्या कथांची निर्मिती कशी शास्त्रीय पद्धतीने केली आहे, गुन्ह्याच्या तपासात हस्ताक्षरशास्त्र आणि फोरेन्सिक सायन्स यांचा उपयोग कसा केला जातो आणि घटनांचे तर्कशुद्ध विश्‍लेषण कसे केले जाते या सायांची माहीती लेखातून मिळते शेरलॉक होम्सच्या कथांमुळे डिटेक्टिव्ह कथा लोकप्रिय झाल्या आणि त्यांना इंग्रजी साहित्यात स्थानही प्राप्त झाले. लेखाच्या अखेरीस सताळकर म्हणतात की होम्सच्या कथा या नेहमीच्या रहस्यकथा न राहता अभिजात साहित्य बनल्या आहेत. अर्थात हे मत सताळकरांचे वैयक्तिक मत म्हणूनच बघावे लागेल.
‘रहस्यसम्राज्ञी अगॉथा ख्रिस्ती’ या दुसऱ्या लेखाच्या शीर्षकामुळे या लेखिकेचे रहस्यकथा आणि कादंबऱ्यातले स्थान लक्षात येते. ख्रिस्तीच्या कादंबऱ्यातून तत्कालीन इंग्लंडच्या परिस्थितीचे आकलन होते. तिच्या कादंवरीतील पात्रे तशी सुसंकृत असतात पण एखाद्या विशिष्ठ परिस्थितीत त्यांच्या हातून गुन्हा घडतो, गुन्हेगार पकडला जातो आणि मग इतर पात्रं प्रेम, दया, माया अशा चांगल्या भावनासह आपले आयुष्य पुढे चालू ठेवतात हे या लेखिकेचे वैशिठ्य आहे. सताळकरांनी अगॉथा ख्रिस्तीने आपली पहिली रहस्य कादंबरी ‘द मिस्टीरियस अफेअर एट स्टाईल्स’ यामध्ये ख्रिस्तीने आपले जगप्रसिद्ध डिटेक्टिव्ह पात्र हरक्यूल पॉयरॉ याला कसं आणलं आणि पुढे हा डिटेक्टिव्ह आपल्या चाळीस कादंबऱ्यात कसा भेटतो याचे समर्पक वर्णन केले आहे. अगॉथा ख्रिस्ती ही विसाव्या शतकातील महान लेखिका कशी आहे हे सताळकरांनी परोपरीने पटवून दिले आहे.
तिसरा लेख ज्या लेखकावर आधारीत आहे त्या आर के नारायण यांना अनेक समीक्षकांनी गौरवले आहे. ‘द डार्क रूम’ आणि ‘स्वामी एंड हिज फ्रेंड्‌स’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या असल्या तरी मालगुडी डेज मालिकेमुळे ते नावारूपाला आले आणि ‘गाईड’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या उंचीवर पोचले. मालगुडी या लहानशा गावातली माणसं त्यांच भाबडेपण आणि इरसालपण जगावेगळे त्यांचे उद्योग आणि मुलुखावेगळं वागणं हे सगळं काही ‘मालगुडी डेज’मध्ये आहे. याविषयी लिहिताना लेखक म्हणतो, ‘नारायण यांचे लेखन मनाला भिडणारे आणि हृदयाला हात घालणारे आहे.’
आयर्विंग वॉलेस हा ‘सामाजिक जाणीव’ असणारा लेखक होता. त्यानी ‘द मॅन’ या अमेरिकन उपाध्यक्षाच्या अपघाती मृत्युनंतर झालेल्या घटनेवर आधारीत कादंबरी लिहिली आहे. या घटनेनंतर एक कृष्णवर्णीय माणुस घटनेच्या तरतुदीप्रमाणे कसा अध्यक्ष होतो आणि त्याचे पडसाद अमेरिकन समाजात कसे उमटतात याचे चित्रण केले आहे. ‘द प्राईज’ या कादंबरीमध्ये नोबेल प्राइज कसे मिळते आणि त्यामागील राजकारण कसे असते याची चर्चा केली आहे. वॉलेसच्या कादंबऱ्यांचे नायक हे आदर्शवादी आणि उदारमतवादी असतात पण ते सुपरमॅन कधीच नसतात हे सांगायला लेखक विसरत नाही.
फ्रेडरिक फोरसिथ च्या राजकीय थरारकथा हा लेख सर्वोत्तम सताळकर त्याच्या ‘द आयकॉन’ आणि  ‘फिस्ट ऑफ गॉड’ या आणि यासारख्या इतर कादंबऱ्यांचा आधार घेऊन रंगवतात त्याचप्रमाणे ऑर्थर हॅले या लेखकाचे औद्योगिक कथाविश्वाही त्यानी प्रभावीरीतीने मांडले आहे. या लेखामुळे औद्योगिक जगामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे जगणे, त्यांच्यामध्ये होणारी जीवघेणी स्पर्धा आणि त्यातल्या परिस्थितीतून निर्माण होणारे नाट्य वाचकांना फार जवळचे वाटते आणि वेगळेही वाटते. त्याचप्रमाणे मारीओ पुझोच्या ‘द गॉडफादर’ या कादंबरीवरचा आणि ‘हॅरी पॉटर’ या बालवाचकांमध्ये अतोनात लोकप्रिय असलेल्या व्यक्रिरेखेची निर्मिती करणाऱ्या जे के रोलींग या लेखिकेवरचे लेखही अतिशय वाचनीय आणि अभ्यासपूर्ण आहेत. डॅन ब्राऊन या गूढरम्य कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकाबद्दल लिहिताना सताळकर नावाचा लेखक त्यात रमून जातो. कारण सर्वोत्तम सताळकर आणि गूढरम्य आणि रहस्यमय विषय यांचे वेगळेच समीकरण आहे. त्याचप्रमाणे चेतन भगत हा भारतीय लेखक नवशिक्षित मध्यमवर्गीय तरूणवर्गामध्ये का लोकप्रिय आहे याचेही त्यानी विश्‍लेषण केले आहे.
एकूण दहा इंग्रजी लेखकावरचे हे लेखन केवळ परिचयात्मकच नाही तर ते समीक्षात्मकही आहे. कधी स्वत:चे मत लेखक प्रांजळपणाने मांडतो तर कधी इतर समीक्षकाची मते देऊन त्या लेखकाच्या लेखनाची पुष्टी करतो. अशाच समीक्षक मनाची आणि साहित्याचे आकलन करण्याची क्षमता असलेला लेख म्हणजे या पुस्तकातला अकरावा लेख ‘इंग्रजी आणि मराठी लेखक- काही निरीक्षणे’ हा आहे. रहस्यमय, विज्ञान कादंबऱ्या भयकथा साहसकथा असे वाचकांचे मनोरंजन करणारे साहित्य मराठीत फारसे विकसित होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही हे लेखकाचे मत अर्धसत्याकडे झुकणारे आहे. विज्ञान कादंबरीच्या संदर्भात हे मत फारसे पटणारे नाही. या लेखात बेस्ट सेलरची संकल्पना, लोकप्रिय साहित्य अशा वेगवेगळ्या विषयांना त्यानी हात घातला आहे. हा विषय इतर दहा लेखांपेक्षा वेगळा आहे.
सरळ सोप्या आणि अर्थपूर्ण भाषेतील लेखन, भारतीय आणि पाश्चात्य जगातले मानाचे स्थान मिळवलेले लेखक आणि त्यांच्या लेखनाचे आकलन व समीक्षण यामुळेही लेखसंग्रह लक्षवेधी ठरला आहे. इंग्रजी साहित्यातील गूढरम्य आणि रहस्यमय विश्व उलगडून दाखवणारे निवडक, वेचक लेखक ज्यांना वाचायचे आहेत, त्यांच्या लेखनाचा आनंद लुटायचा आहे त्यानी हे पुस्तक जरूर वाचावे कारण ‘जादू इंग्लिश लेखणीची’ ही सर्वोत्तम सताळकर यांच्या लेखणीचीही अपूर्व किमया आहे.
लेखसंग्रह: जादू इंग्लिश लेखणीची,
लेखक: सर्वोत्तम सताळकर,
पृष्ठे : १२५,
प्रकाशक: मराठी साहित्य मंडळ गुलबर्गा,
किंमत: १२० रूपये,
संपर्क: ०९२४२१९३७९२.

Posted by : | on : 17 Apr 2015
Filed under : साहित्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g