किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकलबुर्गी (गुलबर्गा), [२० जानेवारी] – गुलबर्गा येथील मराठी साहित्य मंडळ या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात येथील लेखक सर्वोत्तम सताळकर यानी लिहिलेल्या जादू इंग्लिश लेखणीची या पुस्तकाचे प्रकाशन निवृत्त इंग्रजी विभागप्रमुख सरकारी महाविद्यालय गुलबर्गा प्रा. श्रीकांत धारवाडकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून गुलबर्गा विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजया तेलंग याही उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना प्रा. श्रीकांत धारवाडकर यानी इंग्रजी साहित्य हे महासागरासारखे अमर्याद आहे. वेगवेगळ्या विषयावर इंग्रजी कादंबरीकारांनी विपुल आणि समृद्ध लेखन केले आहे त्यापैकी काही लेखकांच्या आढावा घेण्याचा प्रयत्ने या पुस्तकात सर्वोत्तम सताळकरांनी यशस्वीपणे केला आहे असे सांगितले तसेच समाज आणि साहित्य यामधला संबंधही त्यानी विशद करून सांगितला.इंग्रजी भाषा ही शिकायला खूपच सोपी असते त्यामुळेच ती जागतिक भाषा बनली आहे असेही त्यानी सांगितले. पुस्तकाची समीक्षा करताना डॉ. विजया तेलंग यानी हे पुस्तक वाचल्यानंतर मलाही या लेखकांच्या कादंबया वाचण्याची उत्सुकता वाटू लागली आहे असे सांगितले. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्याचे जग हे खूप मोठे असते. इंग्रजी कादंबयाचे प्रकाशन हा जागतिक पातळीवरचा मोठा बिझनेस आहे आणि त्यामुळे इंग्रजी साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा या वेगळ्या असतात असेही त्यानी सांगितले.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष आणि मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. भालचंद्र शिंदे यानी अध्यक्षस्थान भूषवले. याप्रसंगी बोलताना त्यानी यापुढचे मराठी साहित्य हे सताळकरांसारख्या नव्या उमेदीच्या लेखकांकडून येईल असे सांगितले. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्याची जाणीब मराठी वाचकात रूजली पाहिजे तसेच वेगवेगळ्या भाषातल्या साहित्याची देवाणघेवाण ही आपल्या साहित्याला आणि संस्कृतीला समूद्ध करेल असे सांगितले.
याप्रसंगी कार्यवाह विद्याधर मुरूगकर यानी प्रास्ताविक केले. प्रा. व्यंकटेश वळसंगकर यानी परिचय करून दिला. पुस्तकाचे लेखक सर्वोत्तम सताळकर यांचा सत्कार करण्यात आला. गोविंदराव कुलकर्णी यानी सूत्रसंचालन आणि आभारपरदर्शन केले.