|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.66° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 4.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.85°C - 31.15°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.95°C - 32.13°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.1°C - 31.46°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.9°C - 31.53°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.05°C - 29.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.62°C - 28.99°C

sky is clear

अफगाण निर्वासितांना पाकिस्तान सोडण्याचा अल्टिमेटम जारी

अफगाण निर्वासितांना पाकिस्तान सोडण्याचा अल्टिमेटम जारीइस्लामाबाद, (०४ ऑक्टोबर) – पाकिस्तान सरकारने अफगाणांसह अनधिकृत परदेशी नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे आणि जे या कालावधीत देश सोडणार नाहीत, त्यांची मालमत्ता पाकिस्तान सरकार जप्त करेल आणि त्यांना नोव्हेंबरपासून जबरदस्तीने देशाबाहेर काढेल. एका वृताच्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरपासून हद्दपारी आणि मालमत्ता जप्ती सुरू होईल. पाकिस्तानचे पंतप्रधान अन्वारुल हक काकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राष्ट्रीय कृती योजनेच्या सर्वोच्च समितीच्या बैठकीत पाकिस्तानच्या अंतरिम सरकारने हा निर्णय घेतला आहे. बैठकीनंतर...4 Oct 2023 / No Comment /

नवाज शरीफ २१ रोजी पाकिस्तानला परतणार

नवाज शरीफ २१ रोजी पाकिस्तानला परतणारइस्लामाबाद, (०३ ऑक्टोबर) – पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) प्रमुख व माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २१ ऑक्टोबर रोजी बि‘टनमधून पाकिस्तानात परतण्यासाठी विमानाची तिकिटे आरक्षित केली आणि त्यांनी स्वत:हून लादलेला चार वर्षांचा वनवास संपुष्टात आला, असे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. जानेवारी २०२४ मध्ये होणार्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मी २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला परतण्यास उत्सुक आहे, असे नवाज शरीफ यांनी नुकतेच म्हटले होते. नवाज शरीफ सध्या ब्रिटनमध्ये असून, ते...3 Oct 2023 / No Comment /

दस्तावेज फोडल्याच्या प्रकरणात इम्रान खान दोषी

दस्तावेज फोडल्याच्या प्रकरणात इम्रान खान दोषीइस्लामाबाद, (०१ ऑक्टोबर) – पाकिस्तानच्या सर्वोच्च तपास संस्थेने शनिवारी माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना गोपनीय राजनैतिक कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी दोषी घोषित केले. पाकिस्तानमधील एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान आणि त्यांचे सहकारी कुरेशी यांच्याविरुद्ध अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत किंवा न्यायालयीन कोठडीत आहेत. इम्रान...1 Oct 2023 / No Comment /

बांगलादेशात मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये दुप्पटीने वाढ

बांगलादेशात मंदिरांवरील हल्ल्यांमध्ये दुप्पटीने वाढ-हिंदूंना दुर्गापूजेची चिंता, सरकारसमोर पेच, ढाका, (३० सप्टेंबर) – बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यातच या वर्षात आतापर्यंत ३० मंदिरांवर हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षी १५ घटना घडल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात तीन मंदिरांवर हल्ले झाले आहेत. दुर्गामूर्ती खंडित केल्या गेल्या. मंदिरांवरील हल्ल्यामागे कट्टरवादी संघटना हिफाजत-ए-इस्लाम व जमातचा हात असल्याचा आरोप हिंदू अल्पसंख्यक संघटनेने केला आहे. बांगलादेश पूजा समितीचे उपाध्यक्ष महेंद्रकुमार नाथ म्हणाले, १४ ऑक्टोबरपासून दुर्गापूजन आहे. परंतु सव्वा...30 Sep 2023 / No Comment /

पाकिस्तानची चीन, सौदीकडे ११ अब्ज डॉलर्सची मागणी

पाकिस्तानची चीन, सौदीकडे ११ अब्ज डॉलर्सची मागणी– आर्थिक संकट आणखी गडद, इस्लामाबाद, (३० सप्टेंबर) – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात् आयएमएफचा बेलआऊट कार्यक्रम सुरळीत सुरू राहावा आणि देशात आर्थिक स्थिरता दिसावी, यासाठी सध्या आर्थिक संकटात असलेला पाकिस्तानन बाह्य आणि देशांतर्गत संसाधनांमधील अंतर भरून काढण्यासाठी चीन आणि सौदी अरबकडून सुमारे ११ अब्ज डॉलर्सची मदत मागितली आहे. किरकोळ, कृषी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कर जाळ्याचा प्रभावीपणे विस्तार करण्यासाठी आणि बेकायदेशीर चलन हालचालींवर कारवाई सुरू ठेवण्यासाठी काळजीवाहू सरकारच्या दबावादरम्यान ही माहिती...30 Sep 2023 / No Comment /

बलुचिस्तानमधील आत्मघाती स्फोटात ५२ ठार

बलुचिस्तानमधील आत्मघाती स्फोटात ५२ ठार– मशिदीजवळ झाला हल्ला; ५० जखमी, बलुचिस्तान, (२९ सप्टेंबर) – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान ५२ जण ठार, तर सुमारे ५० जण जखमी झाले. ‘ईद-ए-मिलाद उन नबी’, प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक मुस्तांग जिल्ह्यातील मदिना मशिदीबाहेर जमले असता, हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात कर्तव्यावर असलेले मुस्तांगचे पोलिस उपअधीक्षक नवाज गशकोरी यांचाही मृत्यू झाला. शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद जावेद लाहिरी यांनी...29 Sep 2023 / No Comment /

पाकिस्तानमध्ये लाइव्ह शो दरम्यान तुफान मारामारी

पाकिस्तानमध्ये लाइव्ह शो दरम्यान तुफान मारामारीइस्लामाबाद, (२९ सप्टेंबर) – पाकिस्तानशी संबंधित एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विरोधी राजकीय पक्षांचे पाकिस्तानी नेते थेट टेलिव्हिजन दरम्यान बाचाबाची करताना दिसत आहेत. यादरम्यान दोघांमध्ये जोरदार थापा मारल्या जातात. त्याचवेळी दोघेही एकमेकांना शिवीगाळ करताना दिसले. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये वाद सुरू होता. यामध्ये इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयचे नेते आणि त्यांचे वकील शेख मारवत आणि नवाझ शरीफ यांच्या पक्ष पीएमएल-एनचे खासदार अफनान उल्लाह यांच्यात वादावादी झाली....29 Sep 2023 / No Comment /

पाकिस्तान जगभरात एक्स्पोर्ट करतोय ’भिकारी’

पाकिस्तान जगभरात एक्स्पोर्ट करतोय ’भिकारी’– धार्मिक स्थळी कापतात खिसे, – यात्रेकरूंना मिळणार्या व्हिसाचा लाभ घेतात, इस्लामाबाद, (२९ सप्टेंबर) – जगभरात अटक करण्यात आलेल्या भिकार्यांपैकी ९० टक्के पाकिस्तानी वंशाचे आहेत. पाकिस्तानमधील ‘डॉन’ या वृत्तपत्राने आपल्या वृत्तामध्ये ही माहिती दिली. या अनुषंगाने बुधवारी सिनेटच्या परदेशी पाकिस्तानींच्या स्थायी समितीला सांगण्यात आले की, पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात भिकारी परदेशात जात आहेत. यामुळे मानवी तस्करीला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. विदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी समितीला सांगितले की, अनेक भिकार्यांनी...29 Sep 2023 / No Comment /

अमेरिकन राजदूताच्या व्याप्त काश्मिरातील गुप्त दौऱ्यावरून वादळ

अमेरिकन राजदूताच्या व्याप्त काश्मिरातील गुप्त दौऱ्यावरून वादळइस्लामाबाद, (२७ सप्टेंबर) – अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत डोनाल्ड ब्लोम यांच्या व्याप्त काश्मिरातील दौर्यावरून वादळ निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात ते अतिशय गुपचूपपणे पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिट बाल्टिस्तानमध्ये गेले होते. मात्र आता या प्रकरणावरून सर्वत्र गदारोळ झाल्यानंतर अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी प्रतिकि‘या दिली आहे. आमच्या शिष्टमंडळाने जी-२० बैठकीदरम्यान काश्मीरलाही भेट दिली होती. मात्र, डोनाल्ड ब्लोम यांचा पाकव्याप्त काश्मीरचा दौरा पूर्णपणे वेगळा होता. हा दोन देशांमधील प्रश्न आहे, जो द्विपक्षीय पद्धतीनेच...27 Sep 2023 / No Comment /

पाकिस्तानमध्ये जानेवारी २०२४ च्या शेवटी सार्वत्रिक निवडणुका

पाकिस्तानमध्ये जानेवारी २०२४ च्या शेवटी सार्वत्रिक निवडणुकाइस्लामाबाद, (२१ सप्टेंबर) – पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांबाबत मोठी बातमी येत आहे. जानेवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याचे निवडणूक आयोगाने (ईसीपी) जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की ते मतदारसंघांच्या सीमांकनाच्या कामाचा आढावा घेत असून मतदारसंघांच्या सीमांकनासाठी प्राथमिक यादी २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. उपक्रम आणि माहिती ऐकल्यानंतर, शेवटची स्मृती ३० नोव्हेंबर, रोझी प्रसिद्ध केली जेली. ५४ दिवसांचा निवडणूक प्रचार कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होणार...21 Sep 2023 / No Comment /

तुर्कीमध्ये टेस्ला कारखाना सुरू करण्याची तयारी

तुर्कीमध्ये टेस्ला कारखाना सुरू करण्याची तयारी– एर्दोगान-मस्क यांच्यात चर्चा, इस्तंबूल, (१८ सप्टेंबर) – तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांनी न्यू यॉर्कमध्ये इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांची भेट घेतली आणि तुर्कीमध्ये कारखाना सुरू करण्याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. एर्दोगान संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत आहेत. तुर्कीच्या अध्यक्षीय कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, एलन मस्क यांची अंतराळ संशोधन कंपनी स्पेसएक्स आणि तुर्कीच्या स्पेस प्रोग्राममधील संभाव्य सहकार्यावरही चर्चा झाली. एर्दोगान यांनी मस्क यांना सांगितले की, तुर्की...18 Sep 2023 / No Comment /

पशुपतीनाथ मंदिरात दर्शनासाठी नेपाळने ठेवली अट

पशुपतीनाथ मंदिरात दर्शनासाठी नेपाळने ठेवली अटकाठमांडू, (१७ सप्टेंबर) – जर तुम्ही नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर जाण्यापूर्वी हा नवीन नियम जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला २००० रुपये दंड भरावा लागू शकतो. मंदिरातील फोटोग्राफीच्या वाढत्या घटनांदरम्यान, पशुपतीनाथ मंदिराच्या अधिकार्‍यांनी मंदिरात येणार्‍या लोकांना आणि यात्रेकरूंना मुख्य मंदिराच्या परिसरात फोटो काढण्यापासून आणि व्हिडिओ शूट करण्यापासून सावध केले आहे. असे करणार्‍यांना २,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल किंवा सायबर गुन्हे कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते. काठमांडू येथे...17 Sep 2023 / No Comment /