किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलइस्लामाबाद, (०३ ऑक्टोबर) – पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) प्रमुख व माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी २१ ऑक्टोबर रोजी बि‘टनमधून पाकिस्तानात परतण्यासाठी विमानाची तिकिटे आरक्षित केली आणि त्यांनी स्वत:हून लादलेला चार वर्षांचा वनवास संपुष्टात आला, असे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. जानेवारी २०२४ मध्ये होणार्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी मी २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला परतण्यास उत्सुक आहे, असे नवाज शरीफ यांनी नुकतेच म्हटले होते.
नवाज शरीफ सध्या ब्रिटनमध्ये असून, ते २१ ऑक्टोबर रोजी अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहेत. त्याच दिवशी तो अबुधाबीहून लाहोरला जाणार आहे, असे वृत्त एका सूत्राचा हवाला देत समा टीव्हीने दिले आहे. त्यांनी इतिहाद एअरवेजच्या ईवाय २४३ फ्लाईटचे बिझनेस क्लासचे तिकीट आगाऊ बुक केले आहे. इतिहाद एअरवेजचे हे विमान लाहोरमधील अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ६.२५ वाजता उतरेल, असे सूत्रांनी सांगितले. नवाजसोबत येणारे त्यांचे कर्मचारी, वैयक्तिक सल्लागार डॉ. अदनान व सिनेटर इरफान सिद्दीकी असतील. पीएमएल-एनच्या अनेक नेत्यांनी व माजी खासदारांनीसुद्धा अबुधाबी ते लाहोर या एकाच विमानात आपल्या जागा आरक्षित केल्या आहेत.