|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 32.71° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 52 %

वायू वेग : 6.31 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.71° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.39°C - 33.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.11°C - 33.06°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.93°C - 32.79°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.79°C - 32.44°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

28.01°C - 30.67°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.53°C - 29.98°C

sky is clear

शांघाय सहकार्य परिषदेत जिनपिंग-मोदी उपस्थित राहणार

शांघाय सहकार्य परिषदेत जिनपिंग-मोदी उपस्थित राहणारबीजिंग, ७ नोव्हेंबर – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांच्या (एससीओ) प्रमुखांच्या आभासी परिषदेला उपस्थित राहणार आहेत. कोरोना नंतरच्या काळात ‘एससीओ’तील सदस्यांमध्ये परस्परविश्‍वास, विकास, एकता यांना चालना मिळावी, यासाठी ते प्रस्ताव सादर करतील. १० नोव्हेंबर रोजी होणार्‍या या आभासी परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होण्याची शक्यता आहे. ‘एससीओ’ची ही आभासी शिखर परिषद रशिया आयोजित करणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका या ‘ब्रिक्स’ समूहाच्या आभासी परिषदेचेही...7 Nov 2020 / No Comment /

प्रेयसीच्या आग्रहामुळे पुतिन सोडणार रशियाची सत्ता!

प्रेयसीच्या आग्रहामुळे पुतिन सोडणार रशियाची सत्ता!मॉस्को, ६ नोव्हेंबर – आपल्या प्रेयसीच्या खास आग्रहाखातर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन लवकरच सत्तेचा त्याग करणार असल्याचा दावा प्रख्यात राजकीय विश्‍लेषक व्हेलेरी सोलेव्ही यांनी केला आहे. सोलेव्ही यांनी याबाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. याच मुद्यावर त्यांनी न्यू यॉर्क पोस्टलाही एक मुलाखत दिली. पुतिन विविध आजारांनी त्रस्त असून, प्रकृती चांगली ठेवण्यासाठी त्यांच्या ३७ वर्षीय प्रेयसी व मुलींनी त्यांना राष्ट्राध्यक्षपद सोडण्याचा आग्रह केला असल्याचे सोलोवी यांनी सांगितले. पुतीन यांच्या प्रेयसीचे नाव...6 Nov 2020 / No Comment /

लष्करप्रमुख नरवणे यांचा नेपाळ लष्कराकडून विशेष सन्मान

लष्करप्रमुख नरवणे यांचा नेपाळ लष्कराकडून विशेष सन्मानभारत-नेपाळ लष्करी सहकार्य वाढविणार, काठमांडू, ५ नोव्हेंबर – भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्या हस्ते गुरुवारी एका खास समारंभात नेपाळचे मानद लष्करप्रमुख म्हणून सन्मानित करण्यात आले. काठमांडू येथील ‘शीतलनिवास’ या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानावर झालेल्या कार्यक्रमात जनरल नरवणे यांना तलवार आणि पुस्तक भेट देण्यात आले. पंतप्रधान खड्‌गप्रसाद शर्मा ओली, भारतीय राजदूत विनय एम क्वात्रा आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी या समारंभास उपस्थित होते. १९५० मध्ये सुरू झालेली...5 Nov 2020 / No Comment /

पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड

पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोडएका महिन्यातील तिसरी घटना, इस्लामाबाद, २ नोव्हेंबर – पाकिस्तानात अल्पसंख्यक हिंदूंचा छळ करण्याच्या घटना वाढत असतानाच, कराची येथे आज सोमवारी प्राचीन हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. या मंदिरातील देवतेचा पुतळा आणि प्रतिमेचीही विटंबना करण्यात आली. आज सकाळी काही भाविक दर्शनासाठी मंदिरात गेले असता, त्यांना हा प्रकार दिसून आला. या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच, शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि निषेध करू लागले. यापूर्वी १० आणि २४ ऑक्टोबर रोजी सिंध प्रांतात अशाच...3 Nov 2020 / No Comment /

अयाझ सादिक यांना देशद्रोही घोषित?

अयाझ सादिक यांना देशद्रोही घोषित?इस्लामाबाद, १ नोव्हेंबर – खासदार अयाझ सादिक यांनी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेमागील सत्य सांगून पाकिस्तान सरकारला उघडे पाडले आहे. सरकारपुढील अडचणी वाढण्याच्या शक्यतांमुळे सादिक यांना देशद्रोही घोषित करण्याचा निर्णय पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. अयाझ सादिक यांनी देशविरोधी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असे माहिती आणि प्रसारण मंत्री शिबली फराज यांनी सांगितले. शनिवारी गृहमंत्री इजाज शाह यांनीही सादिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा...1 Nov 2020 / No Comment /

तुर्कीत शेकडो लोक ढिगार्‍याखाली दबल्याची भीती

तुर्कीत शेकडो लोक ढिगार्‍याखाली दबल्याची भीती२४ ठार, ८०० जखमी, अंकारा, ३१ ऑक्टोबर – तुर्कीमधील ईझमिर शहरात शुक्रवारी आलेल्या मोठ्या तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक इमारती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून, ढिगार्‍यात शेकडो लोक दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला, तर ८०० हून अधिक जखमी झाले आहेत. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय ग्रीसमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुर्कीचे आरोग्य मंत्री फर्हेटीन कोका यांच्यानुसार, भूकंपात जखमी झालेल्या ४३५ जणांवर...31 Oct 2020 / No Comment /

आशियाई देशांनी फेटाळला चीनचा दावा

आशियाई देशांनी फेटाळला चीनचा दावाचीनने केला दक्षिण चीन सागरावर दावा, मनिला, २८ जून – दक्षिण चीन सागरावर चीनने केलेला दावा आग्नेय आशियातील देशांनी फेटाळला आहे. दक्षिण चीन सागरी प्रदेशात १९८२ चा संयुक्त राष्ट्रांचा महासागरी करार सार्वभौम हक्क व इतर मालकी हक्कांबाबत आधारभूत मानावा, असे आग्नेय आशियातील नेत्यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी १९८२ मध्ये केलेला यूएनसीएलओएस करार सार्वभौम हक्क, कार्यक्षेत्र व कायदेशीर हक्क यास प्रमाणभूत मानावा, असे आशियाई देशांच्या वतीने व्हिएतनामने जारी केलेल्या एका निवेदनात...29 Jun 2020 / No Comment /

पाकिस्तानने दीड महिन्यानंतर पत्रकारांना नेले बालाकोटला

पाकिस्तानने दीड महिन्यानंतर पत्रकारांना नेले बालाकोटलाइस्लामाबाद, ११ एप्रिल – भारताने बालाकोटमध्ये जैशच्या अड्ड्यावर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तब्बल ४३ दिवसांनी पाकिस्तान बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी घेऊन गेले होते. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील ज्या जाबा टेकडीच्या परिसरात हल्ला केला त्या भागातील परिस्थिती दाखवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला. पत्रकार आणि राजनैतिक अधिकार्‍यांना जाबा टेकडीवरील मदरशामध्ये नेण्यात आले त्यावेळी तिथे १०० ते १५० मुले शिक्षण घेत होती. २६ फेब्रुवारीला भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये जणू काही घडलेच नाही हे दाखवण्याचा पाकिस्तानचा...12 Apr 2019 / No Comment /

पाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार

पाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार=जमात-उद-दावा लढणार २०० जागा, वृत्तसंस्था लाहोर, ९ जून – मुंबईवरील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिझ सईदची जमात-उद-दावा ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात पुढील महिन्यात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा लढवणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात आता अतिरेक्यांचाही प्रवेश होणार आहे. पाकमध्ये येत्या २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जमात-उद-दावाने मिल्ली मुस्लिम लीग हा राजकीय पक्ष स्थापन केला आहे, तथापि, त्याची निवडणूक आयोगात अद्याप नोंद झालेली नाही. आता...10 Jun 2018 / No Comment /

रशियाच्या तटस्थ भूमिकेमुळेच चीनची माघार

रशियाच्या तटस्थ भूमिकेमुळेच चीनची माघार-• डोकलाम वाद, मॉस्को, २ सप्टेंबर – बदलत्या जागतिक राजकीय समिकरणामुळे पाकिस्तान आणि चीनने रशियाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना जवळजवळ यशही आले होते. डोकलाम मुद्यावर चीनने भारताला थेट युद्धाची धमकी दिली. भारताचा प्रामाणिक मित्र असलेल्या रशियाला ही बाब मान्य झाली नाही. चीनने भारताविरोधात रशियाला भडकविण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, रशियाने चीनचे समर्थन न करता तटस्थ भूमिका घेतली. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली कणखर भूमिका यामुळेच डोकलाम वादात...3 Sep 2017 / No Comment /

…तर पाकिस्तान एकाकी पडण्याची शक्यता

…तर पाकिस्तान एकाकी पडण्याची शक्यता=शरीफांचा लष्कराला इशारा= इस्लामाबाद, [६ ऑक्टोबर] – भारताच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे धाबे दणाणलेल्या पाकिस्तानमध्ये एक विलक्षण घडामोड झाली असून, जैश-ए-मोहम्मद व इतर दहशतवादी संघटनांविरुद्ध दृष्टीस पडेल अशी ठोस कारवाई करा, अन्यथा जगात एकाकी पडण्याचा धोका आहे, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शक्तिशाली लष्कराला दिला आहे. मंगळवारी झालेल्या एका उच्चस्तरीय गोपनीय बैठकीत नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वातील नागरी सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि लष्करी अधिकार्‍यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली, असे डॉन या पाकी...7 Oct 2016 / No Comment /