किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलमॉस्को, ६ नोव्हेंबर – आपल्या प्रेयसीच्या खास आग्रहाखातर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन लवकरच सत्तेचा त्याग करणार असल्याचा दावा प्रख्यात राजकीय विश्लेषक व्हेलेरी सोलेव्ही यांनी केला आहे.
सोलेव्ही यांनी याबाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. याच मुद्यावर त्यांनी न्यू यॉर्क पोस्टलाही एक मुलाखत दिली. पुतिन विविध आजारांनी त्रस्त असून, प्रकृती चांगली ठेवण्यासाठी त्यांच्या ३७ वर्षीय प्रेयसी व मुलींनी त्यांना राष्ट्राध्यक्षपद सोडण्याचा आग्रह केला असल्याचे सोलोवी यांनी सांगितले.
पुतीन यांच्या प्रेयसीचे नाव ऍलिना कबाईव्हा आहे. पुतिन यांच्यावर कुटुंबीयांचा फार जास्त प्रभाव आहे.
त्यातच ते प्रेयसीचा कोणताही शब्द मोडत नसतात. प्रकृती जोपासण्यासाठी त्यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडावे, हा कुटुंबातील सर्वांचाच आग्रह आहे. या पदावर काम करताना त्यांच्यावर फार जास्त ताण येत आहे, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देणे कुटुंबातील कुणालाच शक्य नाही, असे सोलेव्ही यांनी मुलाखतीत म्हटले आहे. विशेष म्हणजे, पुतिन यांनी जानेवारीमध्येच सत्ता आपल्या सर्वाधिक विश्वासातील नेत्याकडे सुपूर्द करण्याचे संकेत दिलेले आहेत.
सोलेव्ही म्हणाले, पुतिन पार्किसन आजाराने त्रस्त असावे. अलिकडेच त्यांच्यात या आजाराचे लक्षणे दिसून आले होते. अलिकडील काळात त्यांचे पायही थरथरताना आढळून आले होते आणि हेच या आजाराचे लक्षण आहे. त्यांच्या बोटांनाही त्रास होत आहे. पुतीन सध्या ६८ वर्षांचे असून, ७ मे २००० मध्ये त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती.