किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, ६ नोव्हेंबर – अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल आता काही तासांत लागण्याची शक्यता असून, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन विजयापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. ताज्या निवडणूक निकालांनुसार बिडेन हे व्हाईट हाऊसवर दाखल होण्यासाठी आवश्यक असलेल्या आकड्यांच्या जवळ पोहोचले आहेत. मात्र, संपूर्ण मतमोजणी झाल्यावरच आपण अध्यक्षपदी विजयी झाल्याची घोषणा करू, असे बिडेन यांनी म्हटले आहे. निवडणूक निकालाची दिशा बदलवण्याची क्षमता असलेल्या राज्यांमध्येही आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा पुढे आहोत, असेही त्यांनी नमूद केले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बिडेन यांनी ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २६४, तर ट्रम्प यांना २१४ मत मिळाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, बिडेन यांची वेगाने विजयाकडे वाटचाल सुरू असून, २७० या जादूई आकड्याच्या ते अगदी जवळ पोहोचले आहेत. विजयासाठी बिडेन यांना आता अवघ्या सहा प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे.
मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि ऍरिझोना या राज्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या पारड्यात मतांचा कौल दिल्याने जो बिडेन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
बुधवारी बिडेन आणि ट्रम्प यांना मिळालेल्या प्रातिनिधिक मतांमध्ये अनुक्रमे २३८ आणि २१३ असा फरक होता. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा, अरिझोना, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना या सात राज्यांमधून काय निकाल येतो, याकडे लागले होते. यापैकी मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना या चार राज्यांनी बिडेन यांना पसंती दिल्याचे गुरुवारी रात्री उशिरा स्पष्ट झाले. १६ इलेक्टोरल मते असलेल्या जॉर्जियात ट्रम्प यांची आघाडी १९०२ मतांनी कमी झाली आहे. तर २० इलेक्टोरल मते असलेल्या पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांची आघाडी ४२,१४२ मतांनी खाली घसरली.
जॉर्जिया आणि पेनसिल्व्हानियात महत्त्वपूर्ण आघाडी
दरम्यान, ताज्या वृत्तानुसार जो बिडेन यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जॉर्जिया आणि पेनसिल्व्हानिया या राज्यांमध्ये महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. पेनसिल्व्हेनिया येथे, बिडेन यांनी ट्रम्प यांच्यावर ५,५८७ मतांची आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, बुधवारी रात्रीपर्यंत ट्रम्प ७० हजार मतांनी आघाडीवर होते.
जो बिडेन यांनी ऍरिझोना आणि नेवाडा या दोन राज्यांत आपली छोटी आघाडी कायम राखली. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विजेता घोषित होण्यासाठी दोन्ही उमेदवारांना ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मते मिळविणे आवश्यक आहे.
आपण अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणार हे आता स्पष्ट करू शकतो. जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी राज्ये जिंकत आहोत. संपूर्ण मतमोजणी संपल्यावरच आपण विजयाची घोषणा करू आणि आपल्याला हा विश्वास आहे, असे बिडेन यांनी डेलवेअर विलिंग्टनमध्ये सांगितले.