किमान तापमान : 30.15° C
कमाल तापमान : 31.38° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.95 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.38° C
28.21°C - 31.99°C
sky is clear28.5°C - 30.68°C
sky is clear28.95°C - 32.02°C
sky is clear29.07°C - 31.81°C
sky is clear28.96°C - 31.68°C
sky is clear28.5°C - 30.19°C
sky is clearवॉशिंग्टन, [३ डिसेंबर] – एरवी कॉफीचे अतिसेवन करणे धोक्याचे, अशी ओरड असली तरीही दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिण्याने दुसर्या प्रकारात मोडणार्या मधुमेहाचा धोका कमी होतो, हे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाअंती सिद्ध झाले आहे.
एसीएस जर्नलच्या संकेतस्थळावर नॅचरल प्रॉडक्टस् विभागांतर्गत याबाबत माहिती देण्यात आली आहे. सोरेन ग्रेगेर्सन आणि चमूने उंदराच्या पेशींवर विविध प्रकारच्या कॉफीमधील कॅफीनचा होणारा परिणाम तपासला. कॅफेस्टॉल आणि कॅफ्फेईक ऍसिड याबरोबरच ग्लुकोजचे प्रमाण वाढवल्याबरोबरच इन्सुलिन सिक्रिएशनमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच त्याचा स्नायूंमधील पेशींवरही सकारात्मक परिणाम झाल्याचे आढळले.
सध्या मधुमेहाकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांमधील प्रमाणाइतकेच हे प्रमाण होते. त्यामुळे टाईप-२ चा मधुमेह टाळण्यासाठी कॉफी पिणे चांगले, असा निष्कर्ष त्याद्वारे निघाला आहे.