|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.51° C

कमाल तापमान : 27.74° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 2.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.74° C

Weather Forecast for
Saturday, 04 May

27.65°C - 30.55°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.01°C - 30.97°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.26°C - 30.45°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.82°C - 30.02°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.66°C - 29.83°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.67°C - 29.81°C

light rain

आयकर विभागाने काँग्रेसला ठोठावला २१० कोटी रुपयांचा दंड

आयकर विभागाने काँग्रेसला ठोठावला २१० कोटी रुपयांचा दंडनवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी) – आयकर विभागाने काँग्रेसची चार बँक खाती गोठवत २१० कोटी रुपयांच्या दंड ठोठावला. नंतर आयकर विभागाच्या लवादाने गोठवलेले चार खाती मोकळी केली. काँग्रेसची बँक खाती आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी गोठवली होती. गुरुवारी सायंकाळी युवक काँग्रेसचे बँक खातेही गोठवण्यात आले. काँग्रेसने काही जणांचे पैसे देण्यासाठी त्यांना धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश न वटल्यामुळे काँग्रेसने बँकेत चौकशी केली असता, त्यांना आपली खाती आयकर विभागाने गोठवली असल्याचे समजले....18 Feb 2024 / No Comment /

५ वर्षातील निवडणूक बॉन्डचे स्पष्टीकरण द्या

५ वर्षातील निवडणूक बॉन्डचे स्पष्टीकरण द्या– एसबीआयला सुप्रीम कोर्टाचे निर्देश, (१५ फेब्रुवारी) – सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी इलेक्टोरल बाँड योजनेची वैधता ’असंवैधानिक’ ठरवून रद्द केली. सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयात हे मान्य केले आहे की निवडणूक रोख्यांची गोपनीयता हे कलम १९(१) (ए) अंतर्गत माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, निवडणूक रोखे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतात आणि काळ्या पैशाला आळा घालण्याचा एकमेव मार्ग नाही. सर्वोच्च न्यायालयाने बँकांना निवडणूक रोख्यांची विक्री थांबवण्याचे निर्देश दिले आहेत....16 Feb 2024 / No Comment /

१०० दिवसांचे आव्हान पूर्ण करणार्‍याला पंतप्रधान मोदींना भेटण्याची संधी

१०० दिवसांचे आव्हान पूर्ण करणार्‍याला पंतप्रधान मोदींना भेटण्याची संधीनवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी) – जागतिक पुस्तक मेळ्याच्या हॉल क्रमांक १ मध्ये लावण्यात आलेल्या विकास भारत अम्बेसेडर १०० डेज चॅलेंज स्टॉलवर पाहुण्यांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. या स्टॉलचे वैशिष्ट्य म्हणजे १०० दिवसांचे आव्हान पूर्ण करणार्‍याला पंतप्रधान मोदींना भेटण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय इतर भेटवस्तूही देण्यात येणार आहेत. प्रदर्शक प्रदीप यांनी सांगितले की, जेव्हा तुम्ही नमो अ‍ॅपवर लॉग इन कराल तेव्हा त्यात विकसित भारताचे मॉड्यूल दिसेल, त्यामध्ये विविध उपक्रम करण्याची...16 Feb 2024 / No Comment /

सोनिया गांधी निवडणूक लढवणार नाहीत

सोनिया गांधी निवडणूक लढवणार नाहीतनवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी) – राज्यसभा निवडणुकीसाठी राजस्थानमधून उमेदवारी दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या जनतेला भावनिक पत्र लिहिले आहे. यामध्ये प्रकृती आणि वाढत्या वयाचा दाखला देत त्यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, रायबरेलीशी असलेले घनिष्ठ नाते सांगून त्यांनी भविष्यातही कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गांधी घराण्यातील कोणीतरी रायबरेलीतून निवडणूक लढवणार हे त्यांच्या आवाहनावरून स्पष्ट झाले आहे. सोनिया गांधींनी पत्रात लिहिले आहे की,...16 Feb 2024 / No Comment /

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची घोषणा

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची घोषणानवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी) – राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने बुधवारी आणखी काही उमेदवारांची घोषणा केली. पक्षाने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि एल मुरुगन यांना अनुक्रमे ओडिशा आणि मध्य प्रदेशमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना गुजरातमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातून एक दिवस आधी पक्षात दाखल झालेले अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. १५ राज्यांमधील ५६ जागांवर होणार्‍या द्विवार्षिक राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने बुधवारी पाच उमेदवारांची...15 Feb 2024 / No Comment /

वीज बिलापासून मुक्ती; ३०० युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ

वीज बिलापासून मुक्ती; ३०० युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभनवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना ३०० युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ देण्यासाठी योजना सुरू केली आहे. ही योजना केवळ मोफत वीज देणार नाही तर कमाईची संधीही देईल. रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. या योजनेत ७५००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. खरं तर, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३०० युनिटपर्यंत मोफत वीज योजना जाहीर केली होती, जी आता पीएम सूर्या राबवत आहे....15 Feb 2024 / No Comment /

लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश; सोडली काँग्रेस

लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश; सोडली काँग्रेसनवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी) – माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा आणखी एक धक्का आहे. अलीकडेच ते काँग्रेस कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात होते. विभाकर शास्त्री यांनी पक्षात महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते प्रियांका वढेरा यांचे सल्लागारही होते. विभाकर शास्त्री यांनी १९९८ साली उत्तर प्रदेशातील फतेहपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या...15 Feb 2024 / No Comment /

पेटीएमनंतर व्हिसा, मास्टरकार्डला मोठा झटका

पेटीएमनंतर व्हिसा, मास्टरकार्डला मोठा झटकानवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्हिसा आणि मास्टरकार्ड सारख्या विदेशी पेमेंट व्यापार्‍यांना मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च बँकेने त्यांच्या कार्डमधून व्यवसाय पेमेंट थांबविण्यास कडक बंदी घातली आहे. बँकेच्या कारवाईनंतर दोन्ही पेमेंट मर्चंटच्या अधिकार्‍यांनी आरबीआय अधिकार्‍यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कॉर्पोरेट कार्ड-टू-बिझनेस अकाउंट मनी ट्रान्सफर करताना पेमेंट व्यापार्‍यांनी कोणत्या बिझनेस मॉडेलचे पालन करावे, हे दोन्ही पेमेंट कंपन्यांच्या उच्च अधिकार्‍यांना आरबीआई कडून जाणून घ्यायचे आहे. व्हिसा आणि...15 Feb 2024 / No Comment /

कतार तुरुंगातील ८ भारतीय माजी नौसैनिकांची सुटका

कतार तुरुंगातील ८ भारतीय माजी नौसैनिकांची सुटकानवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – कतारमधील तुरुंगात बंद असलेल्या आठ माजी भारतीय नौसैनिकांची सुटका करण्यात आली आहे, त्यापैकी सात भारतात परतले आहेत. ही माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारत या निर्णयाचे स्वागत करतो. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कतारमध्ये अटकेत असलेल्या दहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणार्‍या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचे भारत सरकार स्वागत करते. मंत्रालयाने सांगितले की, मुक्त करण्यात आलेल्या आठ भारतीयांपैकी सात जण भारतातून परतले आहेत. या नागरिकांची सुटका...13 Feb 2024 / No Comment /

राम आणि राष्ट्रासोबत समझोता नाही; यापुढचे आयुष्य पंतप्रधान मोदींसाठीच

राम आणि राष्ट्रासोबत समझोता नाही; यापुढचे आयुष्य पंतप्रधान मोदींसाठीच– आचार्य प्रमोद कृष्णम् यांची प्रतिज्ञा, नवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – कांग्रेसकडून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेले कल्की धामचे आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी, यापुढे माझे आयुष्य फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच राहणार आहे. राम आणि राष्ट्रासोबत मी कुठलाही समझोता करणार नाही. मी आयुष्यभर मोदी यांच्या पाठीशी उभा राहील, अशी प्रतिज्ञा केली. वयाच्या १६-१४ व्या वर्षी राजीव गांधींना दिलेले वचन मी आतापर्यंत पाळले आहे आणि आता वृद्धापकाळात एक संकल्प घेत आहे की,...13 Feb 2024 / No Comment /

लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात सीएए लागू होणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात सीएए लागू होणार– अमित शाह यांनी केली घोषणा, नवी दिल्ली, (१० फेब्रुवारी) – भारतीय जनता पक्ष सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. खरे तर ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल. वास्तविक, त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली आहे. ते म्हणाले, मला हे स्पष्ट करायचे आहे की सीएए कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेणार नाही....10 Feb 2024 / No Comment /

मिथुन चक्रवर्ती कोलकाता रुग्णालयात दाखल

मिथुन चक्रवर्ती कोलकाता रुग्णालयात दाखलमुंबई, (१० फेब्रुवारी) – ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांना आज, शनिवार, १० फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याने आज सकाळी छातीत दुखत असल्याची तक्रार केली, त्यानंतर त्याला कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्तानुसार, मिथुन चक्रवर्ती यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की त्यांना अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्याच्या रुग्णालयात दाखल...10 Feb 2024 / No Comment /