किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– आचार्य प्रमोद कृष्णम् यांची प्रतिज्ञा,
नवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – कांग्रेसकडून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आलेले कल्की धामचे आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी, यापुढे माझे आयुष्य फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीच राहणार आहे. राम आणि राष्ट्रासोबत मी कुठलाही समझोता करणार नाही. मी आयुष्यभर मोदी यांच्या पाठीशी उभा राहील, अशी प्रतिज्ञा केली. वयाच्या १६-१४ व्या वर्षी राजीव गांधींना दिलेले वचन मी आतापर्यंत पाळले आहे आणि आता वृद्धापकाळात एक संकल्प घेत आहे की, यापुढे मी फक्त नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहील, असे ते म्हणाले.
पक्षविरोधी कारवायांसाठी कांग्रेसने मला सहा वर्षांसाठी निष्कासित केले, याची माहिती विविध वृत्तवाहिन्यांमधून मिळाली. यासाठी मी पक्ष नेतृत्वाचे आभार मानतो. मात्र, माझ्या कोणत्या कारवाया पक्षविरोधी होत्या, याचे उत्तर मल्लिकार्जुन खडगे किंवा सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी द्यावे. प्रभू रामाचे नाव घेणे पक्षविरोधी आहे का, असा सवाल आचार्य कृष्णम् यांनी केला. कांग्रेसमध्ये राहायचे असेल तर चमचेगिरी करणे आणि सर्रास खोटे बोलणे आवश्यक आहे. मला हे जमत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आचार्य म्हणाले, आताची कांग्रेस पूर्णपणे बदलली आहे. महात्मा गांधींच्या काँगे्रसला आजच्या नेतृत्वाने कुठे आणून ठेवले आहे, सनातन धर्म नष्ट करणारेच कांग्रेसमध्ये राहू शकतात का, मी त्यांना इतकेच सांगू इच्छितो की, राम आणि राष्ट्रासोबत कुठलाही समझोता केला जाऊ शकत नाही. माझ्यासाठी निष्कासन ही फार लहान गोष्ट आहे.
सचिन पायलट, प्रियांकाबाबतही केले भाष्य
आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी सचिन पायलट आणि प्रियांका वढेरा यांच्याबाबतही भाष्य केले. सचिन पायलट यांना पक्षात फार जास्त अपमान झाला. मात्र, भगवान शिवाप्रमाणे त्यांनी अपमानाचे विष पचविले. या पक्षाने प्रियांका वढेरा यांचाही प्रचंड अपमान केला. महासचिव बनविले, पण कोणतेही अधिकार दिले नाही. हा अपमान कुणाच्या इशार्यावर केला जात आहे, अशी विचारणा त्यांनी केली. विशेष म्हणजे, आचार्य कृष्णम् यांनी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली होती. ते २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहिले होते तसेच या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यासाठी त्यांनी कांग्रेसवर टीकाही केली होती.