किमान तापमान : 24.63° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.55 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.54°से. - 27.77°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल24.63°से. - 28.19°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.58°से. - 28.88°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.85°से. - 29.25°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.36°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.83°से. - 29.02°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी) – आयकर विभागाने काँग्रेसची चार बँक खाती गोठवत २१० कोटी रुपयांच्या दंड ठोठावला. नंतर आयकर विभागाच्या लवादाने गोठवलेले चार खाती मोकळी केली. काँग्रेसची बँक खाती आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी गोठवली होती. गुरुवारी सायंकाळी युवक काँग्रेसचे बँक खातेही गोठवण्यात आले. काँग्रेसने काही जणांचे पैसे देण्यासाठी त्यांना धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश न वटल्यामुळे काँग्रेसने बँकेत चौकशी केली असता, त्यांना आपली खाती आयकर विभागाने गोठवली असल्याचे समजले. आयकर विभागाने दंडापोटी काँग्रेसकडे २१० कोटी रुपयांची मागणी केली आहे. दंडाची ही राशी न भरल्यामुळे आयकर विभागाने ही खाती गोठवल्याचे समजते.
हे प्रकरण २०१८-१९ चे आहे. काँग्रेसला ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आपले आयकर रिटर्न भरायचे होते. काँग्रेसने ते ४५ दिवस विलंबाने भरले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर काँग्रेसने १९९ कोटी रुपये खर्च केले होते. निवडणूक निधी म्हणून आमदार आणि खासदारांनी आपल्या वेतनातून काँग्रेसला १४ लाख ४० हजार निवडणूक निधी रोख स्वरूपात दिला होता. कोणत्याही राजकीय पक्षाला रोख निधी घेता येत नाही. काँग्रेसने रोख निधी घेतल्यामुळे आयकर विभागाने त्यांची बँक खाती गोठवली. यामुळे काँग्रेसजवळ आपल्या कर्मचार्यांचे वेतन करण्यासाठी तसेच वीज देयके भरण्यासाठी पैसे उरले नाही. गोठवलेली खाती मोकळी करण्यासाठी काँग्रेसने आयकर लवादाकडे धाव घेतली. यावर २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. बँक खाती गोठवण्याच्या घटनेवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, कोषाध्यक्ष अजय माकन यांनी टीका केली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर रस्त्यावर उतरून निदर्शनेही केली.
देशातील बहुपक्षीय लोकशाही संकटात आली आहे. ही लोकशाही वाचविण्यासाठी न्यायपालिकेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. बँक खाते गोठवण्याच्या घटनेविरुद्ध रस्त्यावर उतरून निदर्शने करण्याचा इशाराही खरगे यांनी दिला. तिथेच, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते प्राणाचे बलिदान करायला मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला. काँग्रेस धनाच्या नाही तर, जनाच्या ताकदीचे नाव आहे, आम्ही हुकुमशहासमोर कधीच झुकणार नाही, असे ते म्हणाले.