|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

निवडणूक सुरक्षा अधिकार्‍यांनी फेटाळला ट्रम्प यांचा दावा

निवडणूक सुरक्षा अधिकार्‍यांनी फेटाळला ट्रम्प यांचा दावावॉशिंग्टन, १३ नोव्हेंबर – अमेरिकेच्या इतिहासात सर्वात सुरक्षित अशा २०२०च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत तडजोड करण्यात आली होती, असे कोणतेही पुरावे नाहीत, असे स्पष्ट करीत अमेरिकेच्या निवडणूक सुरक्षा अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मतमोजणीत घोटाळा झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने मतमोजणीवर असमाधान व्यक्त करून मतमोजणीत घोटाळा झाल्याचा दावा केला आहे व त्यामुळे त्यांनी अद्याप त्यांनी आपला पराभव मान्य केला नाही. डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन ज्या...13 Nov 2020 / No Comment / Read More »

पद जाताच ट्रम्प जाणार तुरुंगात?

पद जाताच ट्रम्प जाणार तुरुंगात?वॉशिंग्टन, ११ नोव्हेंबर – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपले पद सोडल्यानंतर तुरुंगवास होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले असून, विरोधकांनीही चांगलीच कंबर कसली आहे. पेस विद्यापीठाचे प्रा. बेनेट गर्शमेन यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, राष्ट्राध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहे. यात भ्रष्टाचार, बेनामी संपत्ती, कर चुकवेगिरी, निवडणुकीत गैरप्रकार करणे आदी आरोप आहेत. राष्ट्राध्यक्षपदामुळे...11 Nov 2020 / No Comment / Read More »

बायडेन प्रशासनात २० अमेरिकन भारतीय

बायडेन प्रशासनात २० अमेरिकन भारतीयवॉशिंग्टन, ११ नोव्हेंबर – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यांनतर जो बायडेन यांनी आपल्या पुनरावलोकन संघ कार्यकारिणीमध्ये २० अमेरिकन भारतीयांचा समावेश केलेला आहे. ज्यातील ३ व्यक्ती संघ प्रमुख म्हणून कार्य बघणार आहेत. ही कार्यकारिणी सध्याच्या प्रशासनातल्या प्रमुख सांघिक कार्यकारिणीच्या कार्याचे मूल्यांकन करण्यास जबाबदार राहील व सत्तेचे सहज हस्तांतरण करण्यात मोलाचा वाटा उचलेल. बायडेनच्या हस्तांतर कार्यसंघाने सांगितले की ही नवी कार्यकारिणी अध्यक्षीय अवस्थांतरच्या इतिहासामधील सर्वात वैविध्यपूर्ण पुनरावलोकन संघांपैकी एक आहे. प्रस्तुत कार्यकारिणीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक...11 Nov 2020 / No Comment / Read More »

रिपब्लिकन पक्षाचे १० महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयात

रिपब्लिकन पक्षाचे १० महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयातवॉशिंग्टन, १० नोव्हेंबर – पेनसिल्व्हेनियामधील मतदानाची मेल-इन मतपत्रिका निवडणुकीच्या तीन दिवसानंतर सादर करण्यास खालच्या न्यायालयाने परवानगी दिली होती. या परवानगीस गैर ठरवत रिपब्लिकन पक्षाचे १० महान्यायवादी यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली आहे. पेनसिल्व्हेनिया न्यायालयाने दिलेली परवानगी असंवैधानिक असून यात घटनात्मक अधिकाराचे उल्लंंघन झाले आहे. उशिरा मतपत्रिका स्वीकारण्याचा निर्णय, घटनेतील निवडणूक कलमांचे उल्लंघन आहे, असे महान्यायवादी यांनी म्हटले आहे. यामध्ये मतदारांची फसवणूक होण्याची शंका असल्याचेही ते म्हणाले. ट्रम्प...10 Nov 2020 / No Comment / Read More »

सत्ता हस्तांतरण पत्रावर स्वाक्षरीस ट्रम्प यांचा नकार

सत्ता हस्तांतरण पत्रावर स्वाक्षरीस ट्रम्प यांचा नकारवॉशिंग्टन, १० नोव्हेंबर – राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अमेरिकेत आता सत्ता हस्तांतरणाच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सरकारची सूत्रे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या हस्तांतरणाच्या चमूकडे देण्यास नकार दिला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे त्यांच्यावर निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप सातत्याने करत आहेत. दुसरीकडे, त्यांच्या या भूमिकेवरून त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील मतभेद अधिक तीव्र होत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर सत्तांतर झाल्यास जिंकणारा उमेदवार एक हस्तांतर करणारी (ट्रांझिशन) चमू बनवतो. त्या चमूला सरकारच्या...10 Nov 2020 / No Comment / Read More »

डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षणमंत्र्यांना काढले

डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षणमंत्र्यांना काढलेवॉशिंग्टन, १० नोव्हेंबर – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अधिकृत निकाल लागला नसतानाच, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांना पदावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. एस्पर यांच्या जागी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक ख्रिस्तोफर मिलर यांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या सत्तेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यास केवळ ७२ दिवस उरले आहेत. अमेरिकन माध्यमांमध्ये संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांना संरक्षण मंत्रिपदावरून हटवण्यात येणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. मात्र,...10 Nov 2020 / No Comment / Read More »

ब्राझीलने थांबवली लसीची चाचणी

ब्राझीलने थांबवली लसीची चाचणीचीनला दिला जोरदार झटका, रिओ, १० नोव्हेंबर – कोरोनाची लस विकसित करण्याचा प्रयत्न करणार्‍या चीनला ब्राझीलने जोरदार झटका दिला आहे. चिनी कंपनी सिनोवॅकची लस चाचणी ब्राझीलने थांबवली आहे. लस चाचणी दरम्यान २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका प्रतिकूल घटनेनंतर ही चाचणी थांबवण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मात्र, ही घटना ब्राझीलमध्ये घडली की बाहेरील देशात घडली, याबाबत मात्र कोणतीही माहिती समोर आलेली नाही. साओ पाओले येथील संशोधन केंद्र बुटाननचे प्रमुख डिमास...10 Nov 2020 / No Comment / Read More »

कारकीर्दीत २० हजार वेळा खोटे बोलले ट्रम्प

कारकीर्दीत २० हजार वेळा खोटे बोलले ट्रम्प‘फॅक्ट चेक’ संकेतस्थळाचा दावा, वॉशिंग्टन, ९ नोव्हेंबर – राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीत डोनाल्ड ट्रम्प यांनी २० हजारांहून अधिक खोटी वक्तव्ये केली आहेत, असा दावा ‘फॅक्ट चेक’ संकेतस्थळ पॉलिटीफॅक्टने केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची वक्तव्ये कायम चर्चेत राहिली. ट्रम्प यांनी माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तर माध्यमांनीही ट्रम्प सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या खोट्या वक्तव्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याचा दावा वॉशिंग्टन पोस्टने केला आहे....9 Nov 2020 / No Comment / Read More »

कोरोनावर फायझरची लस ९० टक्के यशस्वी

कोरोनावर फायझरची लस ९० टक्के यशस्वीन्यू यॉर्क, ९ नोव्हेंबर – कोरोना संसर्ग रोखण्यात फायझर कंपनीची लस ९० टक्के यशस्वी झाली आहे, अशी माहिती कंपनीने दिली. चाचणीतील माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला. आपात्कालीन परिस्थितीत या लसीचा वापर करण्याची परवानगी मागणारे पत्र कंपनी पुढील महिन्यात अमेरिकी नियंत्रकांना पाठवणार आहे. परंतु, म्हणून लसीचे उत्पादन ताबडतोब सुरू करण्यात येईल असे नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि इतर पाच देशांमध्ये लसीच्या चाचणीसाठी जवळपास ४४ हजार स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात...9 Nov 2020 / No Comment / Read More »

एकविसावे शतक भारत-अमेरिका मैत्रीचे : बायडेन यांची ग्वाही

एकविसावे शतक भारत-अमेरिका मैत्रीचे : बायडेन यांची ग्वाहीवॉशिंग्टन, ८ नोव्हेंबर – भारतासोबतची मैत्री आणखी मजबूत करण्यावर आपला भर राहणार आहे. एकविसावे शतक हे भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारी व मैत्रीचे राहणार आहे, अशी ग्वाही अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज रविवारी दिली. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाल्यानंतर बायडेन यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली. भारत हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा देश आणि धोरणात्मक भागीदार आहे. द्विपक्षीय व्यापार संबंधात सुधारणा करून, ते अधिक मजबूत करण्यासाठी बराच वाव आहे....8 Nov 2020 / No Comment / Read More »

मी देशाला तोडणारा नाही, जोडणारा : बायडेन

मी देशाला तोडणारा नाही, जोडणारा : बायडेनन्यू यॉर्क, ८ नोव्हेंबर – ७.४ कोटींहून अधिक अमेरिकन लोकांनी मला मते दिली आहेत. मी अमेरिकेकडे एक समग्र, एकात्म राष्ट्र म्हणून पाहतो. मी देशाला तोडणारा नव्हे, तर जोडणारा राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वत:ला पाहातो, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केली. मी राष्ट्रपती म्हणून ‘ब्लू’ किंवा ‘रेड स्टेट’ असे न पाहता अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणून या देशाकडे पाहीन, असेही ते म्हणाले. अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल...8 Nov 2020 / No Comment / Read More »

निकाल मान्य करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार

निकाल मान्य करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकारवॉशिंग्टन, ८ नोव्हेंबर – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन विजयी झाले असले, तरी हा निकाल मान्य करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी मीच असून, सात कोटी वैध मते मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक निकालाविरोधात सोमवारी न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या या पावित्र्यामुळे अमेरिकेतील सत्ता संघर्ष अधिकच तीव्र होणार आहे. ई-मेल आणि मतपत्रिकांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला...8 Nov 2020 / No Comment / Read More »