|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.99° C

कमाल तापमान : 28.14° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 69 %

वायू वेग : 2.43 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.99° C

Weather Forecast for
Friday, 03 May

27.24°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 04 May

27.45°C - 30.54°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

27.69°C - 30.8°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.08°C - 31.07°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.26°C - 30.62°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.88°C - 30.09°C

sky is clear
Home » मुंबई-कोकण » मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले

लोकल सेवा विस्कळीत, विक्रोळीत रस्त्यांना नदीचे स्वरूप,
मुंबई, १९ जुलै – राज्याच्या राजधानीला रविवारी पावसाचा जबरदस्त तडाखा बसल्यानंतर आज सोमवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने पुन्हा झोडपून काढले. उल्हासनगर येथे ४०० मि.मी. इतका पाऊस पडला. भारतीय हवामान खात्याने मुंबईत पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
उपनगरे आणि अन्य ठिकाणी अतिमध्यम ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचवेळी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने अनेक गाड्या उशिराने धावत आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नोकरदार वर्गाचे मोठे हाल झाले आहेत.
मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. पूर्व, पश्‍चिम उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सखल भागात पाणीच पाणी झाले असून, विक्रोळीत तर रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सखल भागात पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीतही जोरदार पाऊस
कल्याण डोंबिवलीत देखील जोरदार पाऊस सुरू आहे. डोंबिवलीच्या नेहरू मार्गावर प्रचंड पाणी साचले असून, दुकानांमध्येही पाणी शिरले आहे. वसईत मुसळधार पाऊस सुरूच आहे. तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
वसईतील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे १२ गावांचा संपर्क तुटला आहे. तर नवी मुंबईत पावसात अडकलेल्या ३७५ जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. आर्टिस्ट व्हिलेज धबधब्यात अडकलेल्या २०० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अडवली-भूतवलीच्या ओढ्यापलीकडे शेतकरी अडकले होते, त्यांचीही सुटका करण्यात आली आहे.
४०० हून अधिक गाड्या पाण्याखाली
या प्रचंड पावसामुळे मुंबईच्या कांदिवलीतल्या ठाकूर कॉम्प्लेक्समधील बीएमसीच्या वाहन तळामधील ४०० पेक्षा जास्त गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. मुसळधार पावसामुळे वाहन तळात पाणी साचले. पावसाचा जोर ओसरल्यानंतर वाहन तळातील पाणी कमी झाले. आपल्या गाड्यांची झालेली दुरवस्था पाहून वाहनमालकांना धक्काच बसला. सध्या या वाहन तळामध्ये शिरलेले पाणी पंपाने उपसण्याचे काम सुरू आहे.
३७५ जणांच्या सुटकेचा थरार
नवी मुंबईच्या सीबीडी भागात असलेल्या एका डोंगरातून रविवारी ३७५ जणांची अग्निशमन दलाने सुटका केली आहे. काल रविवारी मोठ्या संख्येत नागरिक लहान मुलांसह फिरण्यासाठी गेले होते. मात्र, मुसळधार पावसाने ओढ्याचे पाणी वाढले. या पाण्याचा वेग इतका भयंकर होता की, नागरिकांचा परतीचा मार्गच बंद झाला. अखेर या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. जवानांनी या ओढ्यात मानवी साखळी करून ३५० जणांची सुखरूप सुटका केली. यामध्ये अनेक लहान मुलेही होती.

Posted by : | on : 20 Jul 2021
Filed under : मुंबई-कोकण
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g