किमान तापमान : 28.56° C
कमाल तापमान : 28.85° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 5.35 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.85° C
28.72°C - 30.59°C
sky is clear28.09°C - 30.43°C
sky is clear27.96°C - 30.27°C
sky is clear27.6°C - 29.85°C
sky is clear27.94°C - 30.15°C
few clouds27.93°C - 29.93°C
few cloudsइटानगर, (१८ डिसेंबर) – अरुणाचल प्रदेशच्या खोंसा (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यमसेन माटे यांची उग्रवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना भारत-म्यानमार सीमेजवळ तिरप जिल्ह्यात घडली. माटे वैयक्तिक कामासाठी गेले असताना ही घटना घडल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तिरपचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले की, माजी आमदार यमसेन माटे हे त्यांच्या तीन समर्थकांसह वैयक्तिक कामानिमित्त गावात गेले होते, तेव्हा कोणीतरी त्यांना बहाणा करून जंगलात नेले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. पोलिस अधीक्षकांनी हल्लेखोरांची ओळख उघड करण्यास तूर्तास जरी टाळले असले, तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येत एनएससीएन-केवायचा समावेश असण्याची शक्यता आहे. माटे हे २००९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर खोंसा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि या वर्षाच्या सुरुवातीला २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.