किमान तापमान : 31.62° C
कमाल तापमान : 31.87° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 68 %
वायू वेग : 8.17 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.87° C
28.72°C - 32.01°C
broken clouds28.59°C - 30.85°C
scattered clouds28.63°C - 30.61°C
scattered clouds28.59°C - 30.22°C
scattered clouds28.52°C - 30.88°C
light rain28.92°C - 30.67°C
light rainनवी दिल्ली, (१२ जानेवारी) – रामजन्मभूमी आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणार्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अलोककुमार यांनी गुरुवारी दिली.
भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी सोहळ्यास उपस्थित राहणार अथवा नाही, हे स्पष्ट झाले नाही. मी येणार आहे, असे अडवाणी यांनी सांगितले. गरज भासल्यास त्यांच्यासाठी आम्ही विशेष व्यवस्था करू, असे कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. आपण प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येण्याचा प्रयत्न करू, असे मुरलीमनोहर जोशींनी सांगितल्याची माहिती कुमार यांनी दिली. भाजपाच्या संस्थापकांपैकी एक ९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांनी मुरलीमनोहर जोशींसोबत १९८० आणि १९९० च्या सुरुवातीच्या काळात राम जन्मभूमी आंदोलनात आघाडीवर होते. डॉ. मुरलीमनोहर जोशी हे देखील भाजपाचे संस्थापक सदस्य आहेत.