Posted by वृत्तभारती
Tuesday, February 6th, 2024
इस्लामाबाद, (०६ फेब्रुवारी) – पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारचे गृहमंत्री डॉ. गोहर इजाझ यांनी आज मंगळवारी सांगितले की, सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही जिल्ह्यातून किंवा प्रांताकडून विनंती आल्यास सरकार ८ फेब्रुवारीला इंटरनेट सेवा निलंबित करण्याचा विचार करेल. मंत्री, कार्यवाहक माहिती मंत्री मुर्तझा सोलांगी यांच्यासमवेत इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत म्हणाले की, आतापर्यंत कोणत्याही ठिकाणी इंटरनेट सेवा निलंबित करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पण, पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे की, सरकारने निवडणुकीच्या दिवशी म्हणजे...
6 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 16th, 2023
तेहरान, (१६ डिसेंबर) – इराणने देशाच्या आग्नेय भागात इस्रायली मोसादच्या एका गुप्तहेरला फाशी दिल्याचे इराणने म्हटले आहे, अशी माहिती सरकारी टीव्हीने शनिवारी दिली. या गुप्तहेराचे मोसादसह विदेशी गुप्तचर सेवांशी संबंध होता व त्याच्यावर गोपनीय माहिती जारी करण्यात सहभाग असल्याचा आरोप होता असे या वृत्तात म्हटले आहे. न्यायपालिकेने या व्यक्तीला आग्नेय सिस्तान व बलुचिस्तान प्रांताची राजधानी झहेदान येथील तुरुंगात फाशी दिली. वृत्तात व्यक्तीची ओळख पटलेली नाही. एप्रिल २०२२ मध्ये इराणच्या गुप्तचर...
16 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
खैबर पख्तुनख्वा, (०३ नोव्हेंबर) – पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी पोलिसांच्या गस्तीजवळ बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण जखमी झाले. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. पोलिस अधिकारी मोहम्मद अदनानने सांगितले की, डेरा इस्माईल खान शहरातील पोलिस गस्तीजवळ हा स्फोट झाला. मात्र, या स्फोटात मृतांमध्ये पोलिसांचा समावेश आहे की नाही, याची पुष्टी झालेली नाही. दरम्यान, बचाव अधिकारी एजाज महमूद यांनी सांगितले की, या...
4 Nov 2023 / No Comment / Read More »