|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.6° C

कमाल तापमान : 31.19° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 2.26 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.19° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.46°C - 30.36°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.75°C - 29.85°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.52°C - 29.74°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.56°C - 30.53°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.67°C - 30.1°C

light rain
Home »

जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला नेमके काय मिळाले?

जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला नेमके काय मिळाले?– राज ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल, नाशिक, (०२ फेब्रुवारी) – मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे मराठा समाजाला असा कोणता विजय मिळाला, मराठा समाजाला नेमके काय मिळाले, कशाचा विजय साजरा करण्यात आला, असे सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केले. ते येथे पत्रपरिषदेत बोलत होते. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत, त्याबाबत विचारले असता, त्यांनी परखड मत मांडले. मनोज जरांगे यांची मी काही...2 Feb 2024 / No Comment /

ज्ञानवापी पूजेच्या आदेशाविरोधात तातडीने सुनावणी नाही

ज्ञानवापी पूजेच्या आदेशाविरोधात तातडीने सुनावणी नाहीनवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार्‍या ज्ञानवापी मशीद समितीला न्यायालयाकडून दणका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. बुधवारीच वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारीच अंजुमन इंतेजामिया मशिदीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. इकडे समितीचे वकीलही बुधवारी रात्री सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि तातडीने...1 Feb 2024 / No Comment /

ज्ञानवापीच्या वजुखानाचे सर्वेक्षण करा!

ज्ञानवापीच्या वजुखानाचे सर्वेक्षण करा!– हिंदू पक्षाकडून मागणी, नवी दिल्ली, (२९ जानेवारी) – ज्ञानवापी प्रकरणात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अहवाल आल्यानंतर आता हिंदू पक्षाने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत एएसआयला शिवलिंगाचे कोणतेही नुकसान न करता वजुखानाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. खरं तर, मे २०२२ मध्ये वजुखानामध्ये शिवलिंगासारखी आकृती सापडल्याच्या दाव्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही जागा सील करण्यात आली आहे. हिंदू बाजू ते काशी विश्वनाथाचे मूळ शिवलिंग...31 Jan 2024 / No Comment /

रामललाचे वकील म्हणून रविशंकर प्रसाद यांना निमंत्रण

रामललाचे वकील म्हणून रविशंकर प्रसाद यांना निमंत्रणनवी दिल्ली, (२१ जानेवारी) – अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशभरातून जवळपास आठ हजारावर मान्यवरांना बोलवण्यात आले. यात समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी कोणाला आमंत्रित करायचे, याचे काही निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार निमंत्रणे पाठवण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आले. मात्र, हे निमंत्रण ज्येष्ठ भाजपा नेते वा माजी केंद्रीय मंत्री म्हणून नव्हते, तर...21 Jan 2024 / No Comment /

खासदार म्हणून राहुल गांधींच्या अडचणीत वाढ

खासदार म्हणून राहुल गांधींच्या अडचणीत वाढनवी दिल्ली, (१९ जानेवारी) – राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. याचिकेत लोकसभा सचिवालयाने ७ ऑगस्ट २०२३ रोजी जारी केलेली अधिसूचना नाकारण्याची मागणी केली होती, ज्याद्वारे राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने केवळ राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राहुल...19 Jan 2024 / No Comment /

विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात!

विधानसभाध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात!मुंबई, (१५ जानेवारी) – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या खर्‍या शिवसेनेबाबतच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सभापतींच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाकडे आमदारांची संख्या जास्त असून पक्षाच्या घटनेनुसार एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे खरे नेते असल्याचे सांगत सभापतींचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. सभापतींच्या निर्णयानंतरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...15 Jan 2024 / No Comment /

राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्यास कोणताही संकोच करू नये

राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्यास कोणताही संकोच करू नये– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांचा सल्ला, – एक रघुवंशी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद होईल, नवी दिल्ली, (१२ जानेवारी) – अयोध्येतील जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २२ जानेवारी रोजी होणार्‍या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास कोणताही संकोच करू नये, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. सिंग यांनी एका निवेदनात असेही म्हटले आहे की त्यांना ऐतिहासिक अभिषेक समारंभ साठी आमंत्रण मिळाले...12 Jan 2024 / No Comment /

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेप

राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांचा आक्षेपमुंबई, (०९ जानेवारी) – शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वी उद्धव गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाचा निकाल १० जानेवारीला सुनावण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जानेवारी (रविवार) मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी सभापती राहुल नार्वेकर यांच्या भेटीला आक्षेप घेतला आहे. ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, अपात्रतेच्या...9 Jan 2024 / No Comment /

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला स्थगिती

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला स्थगितीनवी दिल्ली, (०८ जानेवारी) – खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे २३ मार्च २०२३ पासून रिक्त असलेल्या पुणे लोकसभा जागेसाठी तातडीने पोटनिवडणूक घेण्यात यावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. विद्यमान लोकसभेचा कालावधी १६ जून रोजी संपुष्टात येणार आहे. अशा स्थितीत पोटनिवडणूक़ घेणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य होणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारही नाही, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्डीवाला आणि न्या....8 Jan 2024 / No Comment /

गौतम नवलखाला सर्वोच्च न्यायालयाचा झटका

गौतम नवलखाला सर्वोच्च न्यायालयाचा झटकानवी दिल्ली, (०४ जानेवारी) – कोरेगाव भीमा हिंसाचारातील आरोपी असलेल्या गौतम नवलखाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा देण्यास नकार दिला. त्याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. यामुळे नजिकच्या भविष्यात नवलखाला जामीन मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एस. व्ही. एन. भट्टी यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने या प्रकरणी सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील इतर आरोपींशी संबंधित एनआयएची याचिका सरन्यायाधीश धनंजय...6 Jan 2024 / No Comment /

चार हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीशपदासाठी पाच नावांची शिफारस

चार हायकोर्टात अतिरिक्त न्यायाधीशपदासाठी पाच नावांची शिफारसनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – सरन्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने चार उच्च न्यायालयांमध्ये अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी केंद्राकडे पाच नावांची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि बीआर गवई यांचा समावेश असलेल्या कॉलेजियमने कायम न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयातील न्यायाधीश राहुल भारती व मोक्ष खजुरिया काझमी या दोन्ही अतिरिक्तन्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली. अतिरिक्त न्यायाधीश न्यायमूर्ती अभय आहुजा यांचीही मुंबई उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश...6 Jan 2024 / No Comment /

जात सर्वेक्षणाची आकडेवारी सार्वजनिक करा: सर्वोच्च न्यायालय

जात सर्वेक्षणाची आकडेवारी सार्वजनिक करा: सर्वोच्च न्यायालय– बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, पाटणा, (०२ जानेवारी) – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारने जात सर्वेक्षण केले आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपली आकडेवारी आणि तपशील सार्वजनिक करण्याचे मोठे आदेश दिले आहेत. जातीच्या आधारावर केलेल्या सर्वेक्षणाचा तपशील सरकारला सार्वजनिक करावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २९ जानेवारीला होणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, बिहारमध्ये करण्यात आलेल्या जात सर्वेक्षणाचा...2 Jan 2024 / No Comment /