|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.64° C

कमाल तापमान : 29.54° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 70 %

वायू वेग : 5.22 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.54° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.51°C - 32.02°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.87°C - 32.93°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29°C - 32.52°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.78°C - 32.42°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.84°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.21°C - 29.62°C

sky is clear
News / Article
Author Name : - वृत्तभारती
Published by : - वृत्तभारती
Author Details : -
Email : - mail@amarpuranik.in
Facebook : -
Twitter : -

जनगणना जातिनिहाय करा!

जनगणना जातिनिहाय करा!-मल्लिकार्जुन खरगे यांचे पंतप्रधानांना पत्र, नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सद्यस्थितीच्या आकडेवारीनुसार देशात जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. मोदी यांना लिहिलेल्या पत्रात खरगे यांनी म्हटले आहे की, अद्ययावत जातिनिहाय जनगणना झालेली नसल्याने विशेषत: ओबीसींसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाकरिता आवश्यक असलेली विश्वसनीय माहिती अपूर्ण आहे. अद्ययावत जातिनिहाय जनगणना व्हावी, ही काँग्रेस पक्षाची मागणी मी या पत्राद्वारे आपल्याकडे करीत...17 Apr 2023 / No Comment /

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नवाझ शरीफ परततील

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नवाझ शरीफ परततील– गृहमंत्री सनाउल्लाह यांची माहिती, इस्लामाबाद, (१७ एप्रिल) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाचे सर्वेसर्वा नवाझ शरीफ सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू होताच लंडनहून देशात परत येतील, अशी माहिती पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या प्रयत्नांनंतरही राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतात १४ मे रोजी निवडणुका होणार नाहीत, असे सनाउल्लाह यांनी स्पष्ट केले. सध्या लंडनमध्ये असलेले...17 Apr 2023 / No Comment /

अतिकच्या हत्येत ‘आयएसआय’चा हात!

अतिकच्या हत्येत ‘आयएसआय’चा हात!– प्रतिबंधित शस्त्रांच्या वापरातून झाला मोठा खुलासा, – हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र, लखनौ, (१६ एप्रिल) – उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमदचे लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानची कुटिल गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध होते. या संदर्भात त्याच्याकडून मोठा खुलासा होण्याची शक्यता पाहता, त्याची हत्या झाली असावी, असा संशय वरिष्ठ अधिकार्यांकडून व्यक्त केला जात आहे. अतिकच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आणि त्याने दिलेल्या कबुलीनाम्यात अतिक म्हणाला होता की, त्याचे तोयबा आणि आयएसआयशी थेट...16 Apr 2023 / No Comment /

अतिकची हत्या; हल्लेखोरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अतिकची हत्या; हल्लेखोरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीप्रयागराज, (१६ एप्रिल) – बाहुबली अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अरुण मौर्य, सनी जुने आणि लवलेश तिवारी या तीन जणांना अटक केली. आज या तीनही हल्लेखोरांना प्रयागराज न्यायालयात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी रात्री या तीन हल्लेखोरांनी अतिक अहमदवर पॉइंट ब्लँक रेंजमधून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अतिक अहमद आणि अशरफ या दोघांचा जागीच मृत्यू झाला....16 Apr 2023 / No Comment /

शाहांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार!

शाहांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार!मुंबई, (१६ एप्रिल) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी मुंबईतील एका कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.दत्तात्रेय नारायण यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ साली महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि डॉ. धर्माधिकारी यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. यासोबतच परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे....16 Apr 2023 / No Comment /

गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीतच शिक्षा व्हावी

गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीतच शिक्षा व्हावी-अतिक अहमदप्रकरणी खरगे यांची भूमिका, नवी दिल्ली, (१६ एप्रिल) – गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी, पण ती कायद्याच्या चौकटीतच. कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी कायद्याचा दुरुपयोग करणे लोकशाहीसाठी घातक आहे, अशी भूमिका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी विशद केली. उत्तरप्रदेशात कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफच्या हत्येप्रकरणी खडगे बोलत होते. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी आपल्या देशात न्यायालय आहे. मात्र, न्यायाच्या मार्गाने न जाता कायदा हातात घेण्याची वृत्ती...16 Apr 2023 / No Comment /

भरदिवसा भाजपा नाशिक शहराध्यक्षावर गोळीबार

भरदिवसा भाजपा नाशिक शहराध्यक्षावर गोळीबारनाशिक, (१६ एप्रिल) – देशात सध्या एका मागोमाग एक हत्या, गोळीबार किंवा एन्काऊंटरच्या घटना घडत आहेत. समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. त्यातच, नाशिक येथे भरदिवसा भाजपाच्या शहराध्यक्षावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. अंबड पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या बाजीप्रभू चौकात हा हल्ला करण्यात आला. घटनेत भाजपा पदाधिकारी राकेश कोष्टी जखमी झाले. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पुढील कारवाईला सुरुवात करून एका संशयिताला अटक केली आहे. मागच्या एका...16 Apr 2023 / No Comment /

अदानी भ्रष्टाचाराचे प्रतीक : राहुल गांधी

अदानी भ्रष्टाचाराचे प्रतीक : राहुल गांधी-पंतप्रधान मोदींवर केली टीका, कोलार, (१६ एप्रिल) – पुढील महिन्यात कर्नाटकात होणार्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असा दावा करीत, उद्योगपती गौतम अदानी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांनी रविवारी कर्नाटक जिल्हा मु‘यालयात अदानी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते येथे ‘जय भारत’ रॅलीला संबोधित करीत होते. १०...16 Apr 2023 / No Comment /

अजित पवार हीच राष्ट्रवादी काँग्रेस, लवकरच तिथी येणार

अजित पवार हीच राष्ट्रवादी काँग्रेस, लवकरच तिथी येणार– गुलाबराव पाटलांचे सूचक वक्तव्य, जळगाव, (१६ एप्रिल) – विरोधी पक्षनेते अजित पवार हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे अजित पवार जे बोलतील, तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. लग्न व्हायचे असेल तर, तिथीची गरज असते. तो तिथी लवकरच येणार असल्याचे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवार युतीत येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, अजित पवारांसोबत...16 Apr 2023 / No Comment /

अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार

अमेरिका बनला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार– चीन दुसर्‍या स्थानावर, नवी दिल्ली, (१६ एप्रिल) – २०२२-२३ या आर्थिक वर्षात अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. या कालावधीत दोन्ही देशांमधील व्यापार १२८.५५ अब्ज डॉलर इतका होता. यावरून दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ होत असल्याचे दिसून येते. वाणिज्य मंत्रालयाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार ७.६५ टक्क्यांनी वाढून १२८.५५ अब्ज डॉलर झाला. मागील आर्थिक वर्षात (२०२१-२२) दोन्ही देशांचा द्विपक्षीय व्यापार ११९.५...16 Apr 2023 / No Comment /

अतिक-अश्रफ हत्या प्रकरणानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर

अतिक-अश्रफ हत्या प्रकरणानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर-पत्रकारांच्या सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाची पूर्वतयारी, -अतिक-अश्रफ हत्या प्रकरणानंतर मोठा निर्णय, प्रयागराज, (१६ एप्रिल) – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. पोलिस कोठडीत असताना अतिक अहमद यांच्यावर हल्ला करणारे तीन तरुण मीडिया कर्मचारी असल्याचे भासवून जमावात सामील झाले होते. अशा परिस्थितीत आता गृहमंत्रालय पत्रकारांच्या सुरक्षेसाठी एसओपी तयार करणार आहे. पत्रकारांना सुरक्षा देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी...16 Apr 2023 / No Comment /

१५ जूनपर्यंत सर्व शाळा बंद; शिक्षण विभागाचा आदेश

१५ जूनपर्यंत सर्व शाळा बंद; शिक्षण विभागाचा आदेशभोपाळ, (१६ एप्रिल) – देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मध्य प्रदेशातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशच्या शिक्षण विभागाने बुधवारी सरकारी शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. जारी केलेल्या आदेशानुसार हिवाळी सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. १ मे ते ९ जून या कालावधीत शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या असणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी १ मे पासून सुरू होणार असून १५ जून २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजेच एकूण...16 Apr 2023 / No Comment /