किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादल– प्रतिबंधित शस्त्रांच्या वापरातून झाला मोठा खुलासा,
– हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र,
लखनौ, (१६ एप्रिल) – उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड अतिक अहमदचे लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानची कुटिल गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध होते. या संदर्भात त्याच्याकडून मोठा खुलासा होण्याची शक्यता पाहता, त्याची हत्या झाली असावी, असा संशय वरिष्ठ अधिकार्यांकडून व्यक्त केला जात आहे.
अतिकच्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आणि त्याने दिलेल्या कबुलीनाम्यात अतिक म्हणाला होता की, त्याचे तोयबा आणि आयएसआयशी थेट संबंध होते. या दोन्ही संघटना पाकिस्तानमधून पंजाब सीमेवर ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे टाकायच्या. त्यांचे भारतातील एजंट ते तिथून गोळा करून जम्मू-काश्मिरातील दहशतवादी संघटनांचे म्होरके आणि देशातील इतर माफियांना पोहोचवायचे. अतिकला पंजाबमधील अशी अनेक ठिकाणे माहीत होते, तिथे हे घडते. अतिकने पोलिसांना सांगितले होते की, त्याला तिथे नेऊन तपास केला तर शस्त्रास्त्रे, पैसा, बनावट चलन जप्त करायला मदत करण्यास तयार आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यावर दोनच दिवसांत झालेली अतिक आणि त्याच्या भावाची हत्या पाकिस्तानकडे अंगुलीनिर्देश करते.
उमेश पाल हत्याकांडातील आरोपी व अतिकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार मसूदचा मुलगा गुलाम या दोघांचा गुरुवारी झाशीत खात्मा करण्यात आला. या दोघांच्या मृतदेहाजवळून .४४५ बोअरचे ब्रिटिश बुलडॉग रिव्हॉल्व्हर आणि वॉल्थर पी ८८ हे ७.६२ व्यासाचे पिस्तूल जप्त करण्यात आले. ही अत्याधुनिक शस्त्रे अतिकचे पाकिस्तानी कनेक्शन अधोरेखित करते.