|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.7° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.01 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.28°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.79°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.79°C - 30.02°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.76°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28°C - 29.92°C

scattered clouds
Weather Forecast for
Monday, 13 May

28.13°C - 30.82°C

broken clouds

माधुरीला धमकावणार्‍याला अटक

माधुरीला धमकावणार्‍याला अटकमुंबई, [५ डिसेंबर] – हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षितला जीवे मारण्याची धमकी देणार्‍या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने, खंडणी न दिल्यास माधुरी आणि तिच्या दोन्ही मुलांची हत्या करण्याची धमकीही दिली होती. या २३ वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने माधुरीला धमकीचे चार एसएमएस पाठवले होते आणि या एसएमएसमधून त्याने माधुरीकडे खंडणीची मागणी केली होती. आपण गँगस्टर छोटा राजनसाठी काम...6 Dec 2014 / No Comment /

हॉलीवूडशी तुलना थांबवा : अनुपम

हॉलीवूडशी तुलना थांबवा : अनुपमचेन्नई, [१५ नोव्हेंबर] – भारतीय चित्रपटसृष्टीची आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीसोबत नेहमीच तुलना होत असते. ही तुलना अयोग्य असल्याचे मत ज्येष्ठ आणि संवेदनशील चरित्र अभिनेते अनुपम खेर यांनी व्यक्त केले आहे. या विषयावर आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. ‘आपण एक युवा राष्ट्र आहोत आणि चित्रपटांपेक्षा इतर अनेक मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. केवळ भारतीय चित्रपटांची तुलना करणे हा प्रकार योग्य नाही आणि त्याची गरजही नाही,’ असे खेर यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला ‘लंच...16 Nov 2014 / No Comment /

अ भा मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटकर

अ भा मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षस्थानी विजय पाटकरकोल्हापूर, [८नोव्हेंबर] – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते विजय पाटकर यांची निवड झाली आहे. कोल्हापुरात महामंडळाच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आणि त्यात पाटकर यांची निवड करण्यात आली. पाटकर हे विद्यमान अध्यक्ष चित्रपट निर्माते विजय कोंडके यांची जागा घेतील. अध्यक्षपदासाठी विजय पाटकर यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते....9 Nov 2014 / No Comment /

आज ‘पु लं देशपांडे’ यांची जयंती

आज ‘पु लं देशपांडे’ यांची जयंतीमुंबई, [८नोव्हेंबर] – महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि ज्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसण्यास शिकविले असे ‘पु. लं. देशपांडे’ यांचा आज वाढदिवस आहे. ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. लेखक, अभिनेते, संगितकार, प्रभावी वक्ते, चित्रपट व टि. व्ही. मालिकाचे निर्माते आणि दिग्दर्शक पु. ल. यांचे वयाच्या ८० व्या वर्षी १२ जुन २००० रोजी पुण्यात निधन झाले. ‘पु. लं. देशपांडे’ यांना पुण्य भूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार, संगीत नाटक...9 Nov 2014 / No Comment /

सदाशिव अमरापूरकर यांचे निधन

सदाशिव अमरापूरकर यांचे निधनफुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन अंत्यदर्शनासाठी चाहत्यांचा जनसागर उसळला नगर जिल्ह्यातील जन्मगावी आज अंत्यसंस्कार मुंबई, [३ नोव्हेंबर] – संवाद फेकण्याच्या अफलातून शैलीमुळे आणि रंगभूमीसोबतच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी व टीव्हीवरील मालिकांमध्ये आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवणारे भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यामुळे पडद्यावरील या महान खलनायकाला वाचविण्यासाठीचे डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. अमरापूरकर यांच्या...3 Nov 2014 / No Comment /

अमिताभ बच्चन यांचा ७२ वा वाढदिवस साजरा

अमिताभ बच्चन यांचा ७२ वा वाढदिवस साजरामुंबई, [११ ऑक्टोबर] – अमिताभ बच्चन यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. जगभरातील चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे. या शुभेच्छांबद्दल चाहत्याचे आभार स्वीकारताना बच्चन यांनी ‘तुमचं प्रेम माझं टॉनिक आहे, हे प्रेम असेच राहू दया’, अशी भावना व्यक्त केली. गेली चार दशके आपल्या अभिनय, स्टाईल आणि विनम्रता या गुणांच्या जोरावर लाखो रसिक प्रेक्षकांच्या हृदयात असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. अमिताभ बच्चन यांना यशाच्या सर्वोच्च...12 Oct 2014 / No Comment /

गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधन

गायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे निधनपुणे, [२ ऑक्टोबर] – गाजलेल्या चित्रपट गीतांमुळे आणि आपल्या सुरेलआवाजामुळे रसिकांच्या मनात जागा मिळविणारे ख्यातनाम पार्श्‍वगायक चंद्रशेखर गाडगीळ यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असे कुटुंब आहे. ‘निसर्गराजा ऐक सांगतो…’ आणि ‘कोण होतीस तू काय झालीस तू…’ या गाजलेल्या गीतांसोबतच अशांती चित्रपटातील ‘शक्ती दे मा’, ‘कुदरत’ या चित्रपटाच्या शिर्षक गीतामुळे ते विशेष लोकप्रिय झाले होते. पं. सदाशिवरावबुवा जाधव...3 Oct 2014 / No Comment /

राणीचा ‘मर्दानी ’ यशस्वी

राणीचा ‘मर्दानी ’ यशस्वीमुंबई, [२२ ऑगस्ट] – ‘सिंघम रिटर्न्स’ मध्ये करीना कपूर अजय देवगणला गमतीनेच म्हणते की, आता लेडी सिंघम यायला हवा आणि हा योगायोग म्हणावा की काय दुसर्‍याच शुक्रवारी राणीचा ‘मर्दानी’ चित्रपट पडद्यावर झळकतो. राणी मुखर्जी यात लेडी सिंघमच्या रूपात म्हणजे पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसते. ‘मर्दानी ’म्हणजे चोर आणि पोलिसांचा खेळ. मात्र चाईल्ड ट्रॅफिं किंगची पार्श्‍वभूमी या चित्रपटात दाखविली आहे. वर्षानुवर्ष सुरू असलेला देह व्यापार आणि त्यात प्रामुख्याने लहान अनाथ मुलींना ओढले...25 Aug 2014 / No Comment /

स्मिता तळवलकर यांचे निधन

स्मिता तळवलकर यांचे निधन=मराठी नाट्य व चित्रपट क्षेत्रावर शोककळा= मुंबई, [६ ऑगस्ट] – मराठी बातम्यांसाठी वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्दीचा प्रारंभ करणार्‍या आणि नंतरच्या काळात अभिनेत्री, रंगकर्मी, निर्माती व दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रात वाटचाल करीत मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीत उंच ‘झोका’ घेणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे आज कर्करोगाने निधन झाले. ‘झोका एकच झोका, चुके काळजाचा ठोका’ हे गीत असलेल्या ‘चौकट राजा’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीचे शिखर गाठणार्‍या स्मिता तळवलकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट व नाट्य...7 Aug 2014 / No Comment /

‘एक विलेन’ सुपरहिट

‘एक विलेन’ सुपरहिट=पहिल्याच आठवडयात ५० करोड= बालाजी मोशनचा ‘एक विलेन’ २७ जून रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने शुक्रवार ते रविवारपर्यंत ५० करोडपर्यंतची कमाई केली आहे. २०१४ च्या ‘जय हो’ नंतर ‘एक विलेन’ हा पहिल्या आठवडयात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या गाण्याने लोकांवर आधीच जादू केली होती. लवकरच ‘एक विलेन’ १०० कोटीच्या दरात जाणार असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. असे झाले तर २०१४ मध्ये १०० कोटीच्या वर...1 Jul 2014 / No Comment /

रजनीकांतचे ट्विटर विश्‍वात पदार्पण

रजनीकांतचे ट्विटर विश्‍वात पदार्पणचेन्नई, (५ मे) – सुप्रसिद्ध तामिळ सुपरस्टार रजनीकांत हेदेखील अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासारख्या भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत समाविष्ट झाले असून, त्यांनी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर ट्विटर या आधुनिक युगाची देण असलेल्या सोशल मीडियात प्रवेश केला. ‘..सुपरस्टाररजनी’ हे ६३ वर्षीय तामिळ अभिनेत्याचे अधिकृत ट्विटर हॅन्डल असून, या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर पदार्पण केल्यानंतर अवघ्या एका तासात त्यांचे ५२ हजार चाहते तयार झाले आहेत. ‘देवाला नमस्कार करून ट्विटरच्या विश्‍वात पदार्पण करीत आहे...5 May 2014 / No Comment /

फाळके पुरस्कार विजेते मूर्ती काळाच्या पडद्याआड

फाळके पुरस्कार विजेते मूर्ती काळाच्या पडद्याआडबंगळुरू, (७ एप्रिल) – प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. के. मूर्ती यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ‘प्यासा’, ‘साहिब, बिबी और गुलाम’ आणि ‘कागज के फूल’ या गुरुदत्त यांच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी सिनेमॅटोग्राफी करण्यासाठीही त्यांना काही प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. गुरुदत्त यांच्या मनातले नेमके हेरणारे आणि त्यानुसारच सिनेमॅटोग्राफी करणारे कलावंत अशी त्यांची ओळख होती. ‘आर पार’ या चित्रपटातही त्यांनी गुरुदत्त...7 Apr 2014 / No Comment /