किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, [११ ऑक्टोबर] – अमिताभ बच्चन यांचा आज ७२ वा वाढदिवस आहे. जगभरातील चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहे. या शुभेच्छांबद्दल चाहत्याचे आभार स्वीकारताना बच्चन यांनी ‘तुमचं प्रेम माझं टॉनिक आहे, हे प्रेम असेच राहू दया’, अशी भावना व्यक्त केली. गेली चार दशके आपल्या अभिनय, स्टाईल आणि विनम्रता या गुणांच्या जोरावर लाखो रसिक प्रेक्षकांच्या हृदयात असलेले अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.
अमिताभ बच्चन यांना यशाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचताना आयुष्यात अनेक चढ उतारांना समोरे जावे लागले आहे. ‘सात हिुदुस्तानी’ हा पहिला चित्रपट मिळवण्यापासून ते ‘कौन बनेगा करोडपती’ पर्यंतच्या प्रवासात अमिताभ यांनी यशाच्या सर्वोच्च धुंदीपासून ते सर्वसामान्य माणसासारखा कर्जाच्या संकटाचा अनुभव घेतला. यश मिळूनही त्यांनी कधीच आपली विनम्रता सोडली नाही आणि म्हणूनच त्यांचे चाहते आजही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात.
या चार दशकाच्या कारर्किदीत अमिताभ यांनी १८०हून अधिक चित्रपटात काम केले आहे. दिलीप कुमार हे आपले आजही आदर्श असल्याचे अमिताभ यांनी सांगितले आहे.
यंदा बच्चन यांचा वाढदिवस आणि ‘करवा चौथ ’ असा योग जुळून आला आहे. खरं तर महिला या दिवशी उपवास करतात मात्र अमिताभ हेही हा उपवास करत आले आहेत. यावर्षी मात्र तब्येतीमुळे डॉक्टरांनी उपवास करायला मनाई केली आहे. त्यामुळे यावर्षी त्यांनी उपवास केला नाही. पण आजचा दिवस मी कुटुंबासोबतच साजरा करणार . असे अमिताभ बच्चन यांनी सांगितले आहे.