किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनागपूर, [७ ऑक्टोबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी कस्तूरचंद पार्कवर आयोजित विराट जाहीर सभेत प्रदेश भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे कौतुकोद्गार काढत असताना देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते आणि अतिशय विनम्रपणे जनसमुदायाला अभिवादन करत याचा स्वीकार करत होते. आ. फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील उमेदवारही आहेत.
देवेंद्र फडणवीस अतिशय धडाडीचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आतापर्यंत अनेक घोटाळे उघडकीस आणून सरकारला धारेवर धरले, लोकांचे प्रश्न सोडवले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, पण त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देणार्या नागपूरकरांचेही अभिनंदन करतो, असे मोदी यांनी म्हणताच उपस्थित जनतेने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांचाही गौरवपूर्ण उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हंसराज अहिर यांनी संसदेत अनेक प्रश्न उपस्थित करत आपल्या भागाच्या विकासाला गती दिली. एवढेच नाही, तर कोट्यवधी रुपयांचा कोळसा घोटाळा उघडकीस आणून सरकारचा भ्रष्ट चेहराही जनतेसमोर आणला. त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे दोघांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. मोदी यांनी आ. देवेंद्र फडणवीस आणि खा. हंसराज अहिर यांच्या मुक्तकंठाने केलेल्या प्रशंसेला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.