किमान तापमान : 27.31° से.
कमाल तापमान : 27.95° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.31° से.
26.99°से. - 30.4°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=पूर्व भागात जा; सूर्य, पृथ्वी, चंद्राची लपाछपी पाहा=
इंदूर, [४ ऑक्टोबर] – या वर्षातील दुसरे आणि शेवटचे खग्रास चंद्रग्रहण येत्या ८ ऑक्टोबर रोजी पाहायला मिळणार आहे. खगोल शास्त्रज्ञांच्या मते सूर्य, पृथ्वी आणि चंद्रातील लपाछपीचा मनमोहक खेळ जर बघायचा असेल, तर देशाच्या पूर्व भागाचा दौरा करायलाच हवा.
भारतीय वेळेनुसार बुधवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ४४ मिनिटांनी या चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. तर, सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटे ७ सेकंदपर्यंत हे ग्रहण कायम राहील. त्याचप्रमाणे सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या त्रिमूर्तीचा रोमांचकारी खेळ दाखविणारा हा खगोलीय घटनाक्रम सुमारे तीन तास २० मिनिटांपर्यंत सुरू राहील, अशी माहिती येथील एका वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञाने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. या चंद्रग्रहणाच्या वेळी जवळपास २३ मिनिटे चंद्र पृथ्वीच्या छायेत पूर्णत: झाकोळून जाईल. भारतात खग्रास चंद्रग्रहणाचे सर्वात सुंदर आणि मनोहारी चित्र पूर्वोत्तर भागात दिब्रुगड, इम्फाळ आणि कोहिमा यासारख्या शहरात दिसण्याची शक्यता आहे. या भागांत देशातील इतर भागांच्या तुलनेत चंद्रोदय लवकर होतो.
हे चंद्रग्रहण या वर्षातील दुसरे आणि शेवटचे राहणार आहे. या वर्षातले पहिले खग्रास चंद्रग्रहण १५ एप्रिल रोजी लागले होते. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जेव्हा पृथ्वी येते त्यावेळी खग्रास चंद्रग्रहण लागते. हे चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहायला काहीच हरकत नाही, असे खगोल शास्त्रज्ञांचे मत आहे.