किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.69°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलबंगळुरू, (७ एप्रिल) – प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. के. मूर्ती यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. ‘प्यासा’, ‘साहिब, बिबी और गुलाम’ आणि ‘कागज के फूल’ या गुरुदत्त यांच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी सिनेमॅटोग्राफी करण्यासाठीही त्यांना काही प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गुरुदत्त यांच्या मनातले नेमके हेरणारे आणि त्यानुसारच सिनेमॅटोग्राफी करणारे कलावंत अशी त्यांची ओळख होती. ‘आर पार’ या चित्रपटातही त्यांनी गुरुदत्त यांच्यासोबत काम केले होते. यानंतर कमाल अमरोही यांच्या ‘पाकिजा’ आणि ‘रझिया सुल्तान’ चित्रपटांमध्येही त्यांनी उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी केली होती. वृद्धापकाळाशी संबंधित आजार सोडल्यास अन्य कुठल्याही आजारांनी त्यांना ग्रासले नव्हते. बंगळुरू येथील शंकरपूरम् निवासस्थानी आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे मुलगी छाया मूर्ती आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले टेक्निशियन ठरले. १९५९ मध्ये त्यांनी ‘कागज के फूल’ या पहिल्याच सिनेमास्कोप चित्रपटाचे चित्रीकरण केले होते. तब्बल चार दशकांच्या दीर्घ कारकिर्दीच्या काळात त्यांना २००५ मध्ये ऍमस्टरडॅम येथे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीच्या ‘लाईफटाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘चौदवी का चॉंद’ या चित्रपटातसाठी त्यांनी केलेले छायाचित्रांकन आजही सर्वोत्कृष्ट मानले जाते.