किमान तापमान : 27.32° से.
कमाल तापमान : 27.98° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.39 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
26.99°से. - 29.5°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.76°से. - 30.97°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27°से. - 30.63°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.46°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल26.12°से. - 29.61°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (७ एप्रिल) – बँकेत नोकरी मिळविण्यासाठी धडपडणार्या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रतिष्ठित आणि आघाडीवर असलेल्या भारतीय स्टेट बँकेने रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने ‘प्रोबेशनरी ऑफिसर’च्या १८३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. यापैकी ७५८ जागा अनारक्षित आहेत. भारताच्या बँकिंग क्षेत्रात एसबीआयचा मोठाच दबदबा असल्याने उमेदवारांना ही एक चांगली संधी चालून आली आहे.
पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराची वयोमर्यादा किमान २१ आणि कमाल ३० वर्षे असायला हवी. वयोमर्यादेत अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे. वयाची मोजणी १ एप्रिल २०१४ पासून करण्यात येईल. अर्जदार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना एसबीआयच्या भारतातील कोणत्याही शाखेत नियुक्त केले जाऊ शकते. या पदांसाठीचे अर्ज केवळ ऑनलाईन भरता येणार असून, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल आहे. अर्ज करताना खुल्या आणि इतर मागासवर्गीय गटातील उमेदवारांना ५०० रुपये, तर अनुसूचित जाती जमातीच्या अर्जदारांना १०० रुपये परीक्षा शुल्क चालानच्या माध्यमातून किंवा ऑनलाईनही भरता येईल. अधिक माहितीसाठी www.sbi.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.