किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.77° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.9°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशचेन्नई, (२२ मार्च) – पुढील काही महिन्यांत भारतीय खाजगी विमानक्षेत्रात सेवा सुरू करणार्या एअर आशियाच्या ताफ्यातील पहिले विमान आज भारतात दाखल झाले. एअरबस कंपनीच्या ए ३२० या प्रकारातील हे विमान आज शनिवारी चेन्नईच्या विमानतळावर उतरले. टाटा सन्स आणि अरुण भाटिया यांच्या टेलिस्ट्रा ट्रेडप्लेस यांच्या संयुक्त भागीदारीतून विमानप्रवास क्षेत्रात प्रवेश करणार्या एअर आशियाचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे उभारण्यात आले आहे.
यासंदर्भात माहिती देताना कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, हो, आमच्या कंपनीच्या मालकीचे पहिले विमान आज विमानतळावर उतरले. तर एअरबसतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे की, एअर आशिया इंडियाला त्यांचे पहिले ए ३२० विमान आज सुपूर्द करण्यात आले आहे. या विमानात ‘शार्कलेट्स’ या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच या विमानांना अत्याधुनिक सीएफएम इंजिन लावण्यात आले असून यामध्ये १८० इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. चेन्नई येथे मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीने १० विमानांची मागणी नोंदविली होती. उर्वरित नऊ विमाने देखील लवकरच कंपनीला सुपूर्द करण्यात येतील, असेही एअरबसतर्फे यावेळी सांगण्यात आले.
एअर आशिया इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिट्टू शांडिल्य यांनी यावेळी सांगितले की, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, आमच्या नव्या ए ३२० विमानांद्वारे आम्ही भारतातील प्रवाशांना स्वस्त आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यशस्वी होऊ. देशांतर्गत प्रवास करणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. या क्षेत्रात प्रवेश करणार्या आमच्या कंपनीने सध्याचा भारतातील विमानप्रवास बाजारपेठेला आवश्यक असणारी व्यापार रणनीती आखली आहे. जेणेकरून कंपनीला आणि ग्राहकांना फायदा होऊ शकेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.