किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.78° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.82 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 30.4°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशचेन्नई, (५ मे) – सुप्रसिद्ध तामिळ सुपरस्टार रजनीकांत हेदेखील अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासारख्या भारतीय सेलिब्रिटीजच्या यादीत समाविष्ट झाले असून, त्यांनी अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज अखेर ट्विटर या आधुनिक युगाची देण असलेल्या सोशल मीडियात प्रवेश केला.
‘..सुपरस्टाररजनी’ हे ६३ वर्षीय तामिळ अभिनेत्याचे अधिकृत ट्विटर हॅन्डल असून, या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर पदार्पण केल्यानंतर अवघ्या एका तासात त्यांचे ५२ हजार चाहते तयार झाले आहेत. ‘देवाला नमस्कार करून ट्विटरच्या विश्वात पदार्पण करीत आहे आणि माझ्या चाहत्यांना मनापासून धन्यवाद. या डिजिटल प्रवासाबाबत खूप उत्सुक आहे’, असे रजनीकांत यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुलगी सौंदर्याने दिग्दिर्शित केलेल्या ‘कोचादैय्यान’ हा आपला आगामी चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असतानाच रजनीकांत यांचा ट्विटर विश्वात प्रवेश झाला आहे हा एक योगायोगच म्हणावा लागेल. रजनीकांत यांनी ट्विटर हॅन्डलवर आपले छोटेसे छायाचित्र प्रकाशित केले आहे. पद्मभूषण या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या रजनीकांत यांनी आपल्या ट्विटसोबत एक व्हिडिओ लिंक केला आहे आणि या व्यासपीठावरून चाहत्यांशी संवाद साधण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. माझ्या चित्रपट कारकिर्दीतील आतापर्यंतचा प्रवास हा एक चमत्कारच आहे आणि याचे संपूर्ण श्रेय चाहत्यांना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियात सक्रिय होण्याचा विचार करीत होतो. परंतु, दुर्दैवाने आतापर्यंत तसे करणे शक्य झाले नाही. ट्विटरच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्यात होत असलेल्या घडामोडी कळतात आणि म्हणूनच मी या व्यासपीठाची निवड केली. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी नेहमीप्रमाणेच सोशल मीडियाच्या क्षेत्रातही त्यांचे जंगी स्वागत केले. भारताच्या आघाडीच्या सेलिब्रिटीजचे डिजिटल नेटवर्क असलेली फ्ल्युअन्स हीच कंपनी रजनीकांतच्या ट्विटरची जबाबदारी सांभाळणार आहे.