किमान तापमान : 27.31° से.
कमाल तापमान : 27.95° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.31° से.
26.99°से. - 30.4°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=केंद्र सरकारचा निर्णय, मुलांचे शैक्षणिक भत्तेही वाढले=
नवी दिल्ली, (७ मे) – आपल्या कर्मचार्यांना अंशत: ‘गिफ्ट’ देताना केंद्र सरकारने आज सरकारी बाबूंच्या मुलांच्या शैक्षणिक भत्त्यासह अन्य विविध भत्त्यांमध्ये वाढ केली आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे ५० लाख कर्मचार्यांना होणार आहे. १ जानेवारी २०१४ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सरकारी कर्मचार्यांच्या मुलांना मिळणारा वार्षिक शैक्षणिक भत्ता आता १८ हजार रुपये करण्यात आला आहे. याचाच अर्थ मासिक १५०० रुपये एवढा हा भत्ता राहणार आहे, असे पंतप्रधान कार्यालयातील कार्मिक व प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. यापूर्वी कर्मचार्यांच्या मुलांना वार्षिक १२ हजार रुपये शैक्षणिक भत्ता मिळत होता.
याशिवाय, सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात मिळणार्या विशेष भत्त्यातही ५०० रुपयांची वाढ करण्यात आली. आतापर्यंत एक हजार रुपये असलेला हा विशेष भत्ता आता १५०० रुपये इतका करण्यात आला आहे. सोबतच, सरकारी कर्मचार्यांच्या अपंग मुलांच्या वार्षिक शैक्षणिक भत्त्यातही मोठी वाढ करण्यात आली आहे. याआधी महिन्याकाठी मिळणारा दोन हजार रुपयांचा भत्ता आता मासिक तीन हजार रुपये करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने आपल्या सर्वच कर्मचार्यांचा महागाई भत्ता शंभर टक्के केला असल्याने, याच पार्श्वभूमीवर कर्मचार्यांना मिळणार्या विविध भत्त्यांमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कार्मिक विभागाने स्पष्ट केले आहे.