किमान तापमान : 26.99° से.
कमाल तापमान : 27.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.99°से. - 29.9°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशसोलापूर, (२७ मे) – ‘मी हरणार याची मला पूर्वकल्पना होती कारण माझ्याच पक्षाचे लोक माझ्या विरोधात काम करीत होते. पण माझं नशीब चांगलं की अनामत जप्त झाली नाही,’ अशी कबुली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सोलापुरात बोलताना दिली. आपल्या परंपरागत मतदारसंघात झालेल्या दारूण पराभवाचे खापर त्यांनी पक्षाच्या लोकांवरच फोडले. ‘आपल्या लोकांकडून दगा होणार याची कल्पना आली होती. म्हणूनच निवडणुकीच्या आधीपासून मी सोलापुरात ठाण मांडून सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. पण शेवटी जे व्हायचं तेच झालं,’ असे निराशाजनक उद्गार शिंदे यांनी काढले.
‘खरं तर मला राजकारणातून निवृत्ती घ्यायची होती. पण पक्षाने आदेश दिल्याने निवडणूक लढविली. माझा पराभव हा जनादेश आहे आणि मीच तो स्वीकारायला हवा. पक्षाच्या पराभवासाठी उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र जबाबदार नाहीत,’ असेही शिंदे यांनी आवर्जून सांगितले. यानंतर आपण राजकारण करणार नसून, पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.