किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=महागाई नियंत्रणात आणण्याचा निर्धार, * आरबीआयचे पतधोरण जाहीर=
मुंबई, [३ जून] – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या तिमाही पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदरात कुठलाही बदल केला नाही. त्याचवेळी त्यांनी महागाई समाधानकारक पातळीपर्यंत खाली आणण्याचा आपला निर्धार जाहीर केला.
व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची अवघ्या दोन महिन्यातील ही सलग दुसरी वेळ आहे. आर्थिक विकासाला गती देण्याला आमचे प्राधान्य आहे. पण, त्याचवेळी महागाईचा स्तर आणखी खाली आणण्याचेही आमचे प्रयत्न राहणार असल्याने सध्याच व्याजदरात कुठलाही बदल करण्यात येणार नसल्याचे राजन यांनी सांगितले.
रेपो दर (आरबीआयकडून बँकांना देण्यात येणार्या कर्जावरील व्याज) आठ टक्के इतकाच कायम ठेवण्यात आला असून, कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) (बँकांना त्यांच्या ठेवींवर मिळणार्या व्याजाचा दर) चार टक्के इतकाच कायम आहे. त्याचवेळी बँकांच्या स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो (एसएलआर) दरात ०.५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. १४ जूनपासून ही दरकपात अंमलात येणार आहे.
२०१४-१५ या वर्षात देशाच्या आर्थिक विकासाचा दर ५ ते ६ टक्के इतका राहील, अशी अपेक्षा राजन यांनी व्यक्त केली आहे. महागाईच्या दरात घट झाल्यास व्याजदरात कपात करण्याचे पर्याय खुले राहतील, असे सांगताना, जानेवारी २०१५ पर्यंत महागाईचा दर टक्क्यांवर येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
Short URL : https://vrittabharati.in/?p=13382