किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 29.93° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.93° से.
27.3°से. - 30.02°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलऔरंगाबाद, [३ जून] – महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात भाजपाची पाळेमुळे मजबूत करणारे आणि लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाराष्ट्राचा गड सर करण्याचा जणू निर्धारच व्यक्त करणारे भाजपाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी अचानक झालेले निधन महाराष्ट्राला आणि समाजमनाला धक्का देऊन गेले आहे.
भाजपाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात रुजवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. प्रमोद महाजन हे युतीचे, तर मुंडे महायुतीचे शिल्पकार आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना एक आठवड्यापूर्वीच केंद्र सरकारमध्ये ग्रामीण विकास, पंचायत राज, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी त्यांनी शिवसेना-भाजपा युतीमध्ये या दोन्ही पक्षांच्या अगदीच विरोधात असणार्या रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले. त्यानंतर महायुती हे नाव खर्या अर्थाने सार्थ ठरण्यासाठी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांना सोबत घेऊन ‘आम्ही पाच पांडव’ असल्याचे सांगितले. हे पाच पांडव आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पाडाव केल्याशिवाय राहाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. भाजपात असतानाही त्यांची इतर पक्षातील नेत्यांसोबतची मैत्री कायम चर्चेत राहिली. विलासराव देशमुख यांच्यासोबतची त्यांची मैत्री महाराष्ट्रासाठी कायम कुतूहलाचा विषय राहिली आहे.
मराठवाड्यातील बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडे यांचा गड होता. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा हे त्यांचे मुळ गाव! अतिशय गरीब, मागासवर्गीय कुटुंबातून ते आले होते. त्यांच्या आईचे नाव लिम्बाबाई आणि वडिलांचे नाव पांडूरंग होते. त्यांच्या पत्नीचे नाव प्रज्ञा आहे. पंकजा, प्रीतम आणि यशश्री या त्यांच्या तीन मुली आहेत. १२ डिसेंबर १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला होता. भाजपाचे स्वर्गीय नेते वसंतराव भागवत यांनी त्यांना राजकारणात आणले होते. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत शिवसेनेच्या सोबतीने १९९५ मध्ये युतीची सत्ता आणली. या सरकारमध्ये मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. या निवडणुकीत त्यांनी शरद पवारांसारख्या मराठा नेत्यांचा प्रभाव थोपवून धरला होता. १९८० ते ८५ आणि १९९० ते २००९ या काळात ते सलग पाचवेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. १९९२ ते १९९५ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. महाविद्यालयीन जीवनात अ. भा. विद्यार्थी परिषदेचे नेते म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणिबाणीविरोधात छेडण्यात आलेल्या आंदोलनातही मुंडे सहभागी झाले होते. नंतरच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला आणि येथूनच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. यानंतर त्यांच्याकडे भाजपाची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते.
भाजपाचा तळागळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून मुंडे यांच्याकडे पाहिले जात होते. बीड जिल्हा परिषदेपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. नंतरच्या काळात ते आमदार खासदार आणि नुकतेच केेंद्रीय मंत्री झाले होते. २००९ मध्ये पक्षाने त्यांना लोकसभा लढण्यास सांगितले आणि ते संसदेत गेले. तिथेही त्यांनी आपली चमकदार कामगिरी दाखविली. या बळावर ते लोकसभेत पक्षाचे उपनेते झाले. महाराष्ट्रात केवळ भाजपा नेते म्हणूनच त्यांनी काम केले नाही, तर राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार असलेल्या बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचेही ते नेते होते. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती. याशिवाय, मावळत्या लोकसभेत रसायन व खत समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
जीवनपट
जन्म : १२ डिसेंबर १९४९
माता-पिता: लिंबाबाई आणि पांडुरंग मुंडे
पत्नी प्रज्ञा मुंडे आणि पंकजा, प्रितम आणि यशश्री या तीन मुली
– महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्य
– आणीबाणीदरम्यान प्रमोद महाजन यांच्यासह तुरुंगवास भोगला
– १९७८ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, पहिल्या प्रयत्नात पराभूत
– १९८० मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड
– १९८० साली रेणापूर मतदारसंघ इथून पहिल्यांदा विधानसभेवर
– १९८५ साली कॉंग्रसेच्या पंडितराव दौंड यांच्याकडून पराभवाचा धक्का
– १९९० साली पुन्हा एकदा विधानसभेवर
– १९९२ विधानसभा विरोधीपक्षनेतेपदाची धुरा सोपविण्यात आली
– १९९० ते ९५ दरम्यान मुंबईत पाळेमुळे रोवलेल्या अंडरवर्ल्डला हादरा
– १९९५-९९ साली युती सरकारच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्रिपदी विराजमान
– गृह आणि उर्जा या दोन खात्यांची धुरा
– त्यांच्या कारकीर्दित सर्वाधिक एन्कांऊटर, अंडरवर्ल्डला धक्का
– २००९ साली बीड मतदार संघातून पहिल्यांदा लोकसभेवर
– २००९ साली लोकसभेतील भाजपा उपनेतेपदी निवड
– २०१४ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरेश धस यांचा पराभव करून निवडणूक जिंकली.
– २६ मे २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला
– ३ जून २०१४ रोजी रस्ते अपघातात दु:खद निधन