किमान तापमान : 29.34° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.62°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलपरळी वैजनाथ, [३ जून] – गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच, मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथजवळ असलेले नाथ्रा हे त्यांचे गाव दु:खाच्या सागरात बुडाले. आपला लाडका नेता आता आपल्याला कधीच दिसणार नाही, या विचारानेच गावातील प्रत्येक व्यक्ती हळहळली होती.
मुंडे यांच्या निधनाचे वृत्त वार्यासारखे पसरले. आणि लोक समुहा-समुहाने रस्त्यावर येत होते. या वृत्तावर नाथ्रा आणि परळी वैजनाथमधील कुणाचाही विश्वास बसत नव्हता. पण, अखेर वास्तव त्यांना स्वीकारावे लागले. प्रत्येकाच्याच घरातील टीव्हीवर केवळ वृत्तवाहिन्यांचेच चॅनल सुरू होते. रस्त्यारस्त्यांवर लोक उभे राहून, ‘असे घडलेच कसे’ यावर विचार करीत होते. मागास समाजातील मुंडे यांचे शेकडो समर्थकही दु:खी होते. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहात होत्या. आज आपला लाडका नेता बीडमध्ये येणार, या बातमीमुळे प्रत्येक नागरिक आनंदी होता. परळीत आयोजित सत्कारानंतर मुंडे गावालाही भेट देतील, असा विश्वासही लोकांमध्ये होता. पण, मुंडे यांच्या निधनाचेच वृत्त येऊन धडकल्याने प्रत्येक जण हळहळला. मंगळवारची सकाळ इतकी दुर्दैवी राहील, असा विचारही कुणी कदाचित केला नसावा.