किमान तापमान : 27.2° से.
कमाल तापमान : 27.62° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 69 %
वायू वेग : 4.07 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.2° से.
26.99°से. - 30.28°से.
शनिवार, 15 मार्च27.1°से. - 29.08°से.
रविवार, 16 मार्च26.83°से. - 28.99°से.
सोमवार, 17 मार्च26.26°से. - 28.23°से.
मंगळवार, 18 मार्च26.23°से. - 28.99°से.
बुधवार, 19 मार्च26.8°से. - 28.75°से.
गुरुवार, 20 मार्चनवी दिल्ली, [९ जून] – मान्सूनने अवघ्या दोन दिवसांत संपूर्ण केरळला आपल्या कक्षेत घेतल्याची आनंदाची बातमी असतानाच, हवामान खात्याने एक वाईट बातमीही दिली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस ९३ टक्क्यांपेक्षाही कमी पडणार असल्याचा अंदाज आहे. केरळ व्यापल्यानंतर मान्सूनच्या गोव्याच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासात व्यत्यय आला आहे. त्यामुळे मान्सूनचे गोव्यातील आगमन उशिराने होणार आहे. कृषीप्रधान देश असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मान्सून हा फार महत्त्वाचा घटक आहे. अंदमानमध्ये दोन दिवस आधी आगमन झाल्यानंतरही केरळात तो तब्बल एक आठवडा उशिरा पोहोचला. जून ते सप्टेंबर असे चार महिने भारतात मान्सूनचा पाऊस पडत असतो. गेल्या वर्षी मान्सूनने सरासरी ओलांडली होती. तर, त्यापूर्वीच्या वर्षातही मान्सूनचा पाऊस सरासरीच्या प्रमाणातच कोसळला होता. यावर्षी मात्र या चार महिन्यांच्या काळात ९३ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडणार असल्याने देशाच्या काही भागात कोरड्या दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर-पश्चिम भारतात ८५ टक्के, मध्य भारतात ९४ टक्के, दक्षिण भारतात ९३ टक्के आणि पूर्वोत्तर भारतात ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याचा हवाला देत विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी पत्रकारांना मान्सूनबाबत माहिती दिली. गेल्या एप्रिलमध्ये हवामान खात्याने देशात यंदा ९५ टक्के पाऊस पडणार असल्याचे भाकीत केले होते. यंदाच्या मान्सूनचा अंदाज एल-निनोच्या स्थितीनुसार बांधण्यात आला आहे. कदाचित जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला मान्सूनला गती प्राप्त होऊ शकते. यंदा ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडेल. पण, सध्यातरी कमजोर एल-निनोमुळे आगामी दीड महिना कमी पाऊस पडणार आहे, असे त्यांनी सांगितले. केरळला पूर्णपणे व्यापल्यानंतर आपल्या पुढील प्रवासाला निघालेल्या मान्सूनच्या मार्गात पुन्हा एकदा कमी दाबाच्या पट्ट्याने अडथळा निर्माण केला आहे. अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य आणि दक्षिण-पूर्व भागात हा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी चोवीस तासात गोव्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे, असे वेधशाळेच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. व्ही. एम. मिनी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
मान्सून आजच मुंबईत धडकणार
दरम्यान, मुंबईला मात्र उद्या मंगळवारीच मान्सून धडक देणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या मुंबई, गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनपूर्व सरी कोसळत आहेत. मुंबईच्या सीमेवर आगमन होण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे सूत्राचे मत आहे.