किमान तापमान : 29.34° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.62°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, [११ जून] – देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनतर्फे देशातील अन्य पाच विभागात थ्रीजी सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना आरकॉमच्या ग्राहक व्यापार विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरदीप सिंह यांनी सांगितले की, सध्या कंपनीतर्फे देशातील १३ विभागात थ्रीजी सेवा दिली जात आहे. अन्य पाच विभागांत थ्रीजी सेवा सुरु केल्यानंतर देशातील सर्व प्रमुख शहरांत कंपनीची ही सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे डाटा मार्केटमध्ये कंपनी अधिक जोमाने वाटचाल करू शकेल. देशात स्मार्टफोन्सच्या वापरात ८० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे आपोआपच इंटरनेट वापरणार्यांच्या संख्येत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. थ्रीजी सेवेच्या विस्तारामुळे या ग्राहकांना कंपनीकडे आकर्षित करण्याचे आमचे लक्ष्य पूर्ण होऊ शकेल, अशी आम्हाला आशा आहे, असेही त्यांनी सांगितले.
कंपनीतर्फे सध्या दिल्ली, मुंबई, कोलकाता, पंजाब, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, बिहार, ओडिशा, आसाम, उत्तर पूर्व आणि जम्मू-काश्मीर या विभागांत थ्रीजी सेवा पुरविण्यात येत असून पुढील टप्प्यात आता तामिळनाडू, आंधप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि पूर्व उत्तरप्रदेश या पाच विभागांंमध्ये थ्रीजी सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.