किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल=आता उरले केवळ शंभर दिवस, ७० टक्के प्रवास पूर्ण=
बंगलोर, [१६ जून] – आजपासून बरोबर शंभर दिवसांनंतर भारत नवा इतिहास रचणार आहे. तपकिरी रंगाच्या मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी भारताने पाठविलेल्या मंगळयानाने ७० टक्के प्रवास पूर्ण केला असून, आजपासून शंभराव्या दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी हे यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत दाखल होणार आहे. आतापर्यंत केवळ चार देशांनीच मंगळावर आपले यान पाठविले आहे. यात आता भारताचेही नाव सन्मानाने घेतले जाणार आहे.
एकूणच, २४ सप्टेंबर रोजी तंत्रज्ञान क्षेत्रातील आणखी एक मैलाचा दगड भारत देश पार करणार आहे. या दिवशी मंगळाच्या कक्षेत आपले अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेले यान प्रवेश करणार आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) बंगलोर येथील मुख्यालयाने दिली.
गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रातून पीएसएलव्हीच्या माध्यमातून भारताने आपली महत्त्वाकांक्षी मंगळ मोहीम प्रारंभ केली होती. पृथ्वी ते मंगळ हा प्रवास ३०० दिवसांचा निश्चित होता. ४५० कोटी रुपये खर्चाच्या या मंगळ मोहिमेमुळे मंगळ ग्रहाच्या अभ्यासाची सुवर्ण संधी जगभरातील वैज्ञानिकांना उपलब्ध होणार आहे.
मंगळयानाने २०० दिवसांच्या आपल्या प्रवासात आतापर्यंत ७० टक्के पेक्षा जास्त अंतर पूर्ण केले असून, ते अतिशय वेगाने मंगळाच्या दिशेने जात आहे. सध्या हे यान पृथ्वीपासून १०८ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. यानातून कुठलाही संदेश पृथ्वीपर्यंत येण्याकरिता केवळ सहा मिनिटांचा अवधी लागणार आहे. मंगळयान आणि त्यावरील पाचही पे-लोडस् सुस्थितीत असल्याचे इस्रोने आपल्या फेसबुक पेजवर नमूद केले आहे.
दरम्यान, मंगळ मोहिमेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठताना इस्रोने गेल्या ११ जून रोजी दुपारी साडेचार वाजता यानावर दुसरी ‘ट्रॅजेक्टरी करेक्शन मॅनोव्हर’ (टीसीएम-२) प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. यानाची दिशा अचूक राहावी आणि त्याची गती वाढावी, यासाठी ही प्रक्रिया पार पाडणे आवश्यक होते. पुढील ‘टीसीएम’ प्रक्रिया ऑगस्टमध्ये पार पाडण्याची इस्रोची योजना आहे. यानंतर २४ सप्टेंबर रोजी यानाचा मंगळप्रवेश होणार आहे.