किमान तापमान : 28.54° से.
कमाल तापमान : 29.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.54° से.
27.45°से. - 29.9°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.47°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.29°से. - 31.41°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.45°से. - 30.88°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.91°से. - 30.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.48°से. - 30.03°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश=भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचे संशोधन=
लंडन, [२० जून] – रोज टोमॅटोची एक गोळी घेतल्याने रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारून हृदयविकार टाळता येतो असा दावा भारतीय वंशाचे वैज्ञानिक डॉ. जोसेफ चेरियन यांनी केला आहे. हृदयविकारासंबंधी संशोधन करणार्या वैज्ञानिकांच्या गटाचे डॉ. चेरियन प्रमुख असून त्यांनी शोधून काढलेली ‘टोमॅटोची गोळी’ भविष्यात वैद्यकीय विश्वात मोठीच क्रांती घडवून आणू शकते. विशेष म्हणजे ब्रिटिश संशोधकांनी टोमॅटोच्या या गोळीची चाचणी घेतली आहे. संशोधनातील हे निष्कर्ष पीएलओएस वन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. टोमॅटोतील लायकोपिन या नैसर्गिक अँटीऑक्सिडंटमुळे त्याला लाल रंग येत असतो. ही टोमॅटोची गोळी काहींना देण्यात आली, तर ७२ प्रौढांना बनावट औषध देण्यात आले. मात्र, ज्यांनी टोमॅटोची गोळी घेतली होती त्यांच्या रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारले. केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असलेल्या थेरानॉस्टिक्स कंपनीने ही टोमॅटो गोळी तयार केली आहे. कंपनीच्या वैद्यकीय पथकाने ही गोळी परिणामकारक आहे की नाही याचा शोध घेतला. हृदयविकार असलेल्या ३६ जणांना आणि निरोगी असलेल्या ३६ जणांना बनावट गोळ्या देण्यात आल्या. गोळ्यांमध्ये काय आहे हे रुग्णांना सांगितले नव्हते व संशोधकांनाही सांगण्यात आले नव्हते. दोन महिन्यांच्या अभ्यासानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आले, असे संशोधकांनी म्हटले आहे. हातातील रक्तप्रवाह हा हृदयविकाराच्या धोग्याचे निदर्शक असतो त्यामुळे काहीवेळा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन किंवा त्या आकुंचित होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकारात रुग्णांना सुधारित टोमॅटो गोळी देण्यात आली असता त्यांचा रक्तप्रवाह सुधारला. ज्यांना बनावट गोळी देण्यात आली होती त्यांच्यात रक्तप्रवाह सुधारला नाही. टोमॅटोच्या गोळीने रक्तदाब, धमन्यांचा कडकपणा, रक्तवाहिन्यांतील मेद यावर काही परिणाम झाला नाही. या संशोधनामुळे हृदयविकार असलेल्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
मात्र, हृदयविकारावरील नेहमीच्या औषधांना रोज टोमॅटोची एक गोळी हा पर्याय होऊ शकत नाही, असे या क्षेत्रातील प्रमुख संशोधक डॉ. जोसेफ चेरियन यांनी स्पष्ट केले आहे. केवळ पूरक म्हणूनच या गोळ्यांचा वापर करणे शक्य आहे. या गोळीने हृदयविकार नियंत्रित राहील, याची खात्री पटण्यासाटी आणखी संशोधन व प्रयोगाची आवश्यकता असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.